महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या भारताच्या जोडीला एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. जोनाथन मरे आणि फ्रेडरिक नेल्सन या जोडीने भूपती-बोपण्णा जोडीचा ‘ब’ गटातील पहिल्याच सामन्यात ६-४, ७- (१), १०-१२ असे पराभूत केले. पॅरीस येथील मास्टर्स स्पर्धा जिंकून भूपती-बोपण्णा ही स्पर्धा खेळण्यासाठी आले होते, त्यामुळे प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा  होत्या, पण पहिल्याच फेरीत त्यांना डेन्मार्कच्या जोडीकडून पराभूत व्हायला लागल्याने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला. भारताचा लिएण्डर पेस आणि त्याचा सहकारी रॅडेक स्टेपनाक यांचा सामना पाकिस्तानचा ऐसाम-उल-हक-कुरेशी आणि डचच्या जीन-ज्युलियन रॉजर यांच्याशी होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boppana bhupati lost first match