India vs Australia 2024 Test Series Schedule: बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील ही हायव्होल्टेज लढत कसोटी मालिकेत पाहायला मिळणार आहे. ५ सामन्यांची ही कसोटी मालिका येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील सामने नेमके कधी कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार याचा आढावा घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत – ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील सामन्यांच्या वेळा या भारतीय प्रमाणवेळेनुसार खूपच वेगळ्या आहेत. काही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी तर काही सामने अगदी पहाटेच सुरू होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे, ज्याची वेळ भारतीय वेळेनुसार सकाळी ७:५० आहे. जर दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र असेल तर तो ९:३० वाजता सुरू होईल.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. संपूर्ण पाच दिवसांचा सामना जर खेळवला गेला तर भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी डबल मनोरंजनाची संधी असणार आहे. कारण इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ पूर्वी महालिलावा याच कसोटी सामन्यादरम्यान होणार आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे आयपीएल २०२५ महालिलाव होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू मेगा लिलावात उतरले आहेत.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास

भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी:
२२-२६ नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ (सकाळी ७.५० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी:
६-१० डिसेंबर, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (सकाळी ९:३० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी:
१४ – १८ डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी:
२६-३० डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (सकाळी ५.०० वाजता)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी:
३-७ जानेवारी (२०२५), सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी (सकाळी ५.०० वाजता)

प्राईम मिनिस्टर इलेव्हन वि भारत अ – २ दिवसीय सराव सामना:
३० नोव्हेंबर-०१ डिसेंबर, मनुका ओव्हल, कॅनबेरा (सकाळी ९.१० वाजता)

हेही वाचा – Monkeygate Controversy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील प्रसिद्ध मंकीगेट प्रकरण काय होतं? हरभजन-सायमंड्समध्ये त्यावेळी नेमका कसा झाला वाद?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ:

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Border gavaskar trophy 2024 2025 schedule date match time squads results venues india vs australia bgt all details in marathi bdg