Wasim Jaffer on KL Rahul: भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल याच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. त्याच्या जागी युवा शुबमन गिल याला संघात सामील करण्यात आले आहे. राहुलची एकंदरीत कसोटी आकडेवारी आणि मागच्या काही कसोटी सामन्यांमधील त्याचे प्रदर्शन, हे पाहता संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे दिसते. यावर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने नाराजी व्यक्त करत त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावर सडकून टीका केली आहे.

भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने सलामीवीर केएल राहुलला फटकारले आहे. तो म्हणाला की, “त्याच्या खेळातून आक्रमक फलंदाजीचा दृष्टिकोन दिसत नाही. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिस-या कसोटीत इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.” आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना जाफरने सांगितले की, “राहुल फक्त क्रीजमध्ये राहून फटके मारण्याचा प्रयत्न करू पाहत आहे आणि त्यामुळेच त्याच्या फलंदाजीचा आक्रमक दृष्टिकोन चुकत आहे.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा: Virat Kohli Record: इंदोर कसोटीत किंग कोहली मोडणार अनेक विक्रम; द्रविड-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये होणार सामील

वसीम जाफरची केएल राहुलच्या तंत्रावर डागली तोफ

“केएल राहुलच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर मी खूश नाही. असे दिसते की त्याला फक्त क्रीजमध्ये राहून फटके मारण्याचा प्रयत्न करत आहे. मोठे फटके मारून धावा काढणे हा आक्रमक दृष्टीकोन त्याच्या फलंदाजीतून गायब आहे. जर तो तिसरी कसोटी खेळला, तर त्याने केवळ धावा काढण्याकडे लक्ष दिले पाहिजे. खेळपट्टीचा कसा उपयोग करायचा हे त्याने द्रविडकडून शिकायला हवे. मला वाटते की हे त्याच्या फलंदाजीतील सगळ्यात मोठा दोष असून या दुबळ्या पॅचवर मात करण्यास प्रशिक्षक काहीतरी मदत करेल,” असे जाफर म्हणाला. इंदोर कसोटीत भारताचा कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिलने सलामीला फलंदाजी केली. ब्रेक हा राहुलसाठी चमत्कार घडवून आणेल असेही जाफर म्हणाला.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: कांगारूंसमोर भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल, पहिल्या सत्रात निम्मा संघ तंबूत

संघातून बाहेर काढण्याचा निर्णय का घ्यावा लागला?

मागच्या काही वर्षांमध्ये केएल राहुलने भारतासाठी एकदिवसीय आणि टी२० फॉरमॅटमध्ये धमाकेदार खेळी करून दाखवली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असेच दिसते. राहुलने भारतीय संघासाठी आतापर्यंत ४७ कसोटी सामने खेळले असून यात त्याची सरासरी ३३.४४ राहिली आहे. राहुल संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी येत असल्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याची खेळी महत्वाची असते. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी पाहता, प्रदर्शन समाधानकारक नसल्याचेच दिसते. त्याने या ४७ कसोटी सामन्यांमध्ये ७ शतक आणि १३ अर्धशतकांच्या मदतीने २६४२ धावा केल्या आहेत. तसेच राहुलचे शेवटचे कसोटी शतक देखील २६ डिसेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना आले होते.

Story img Loader