बॉर्डर गावसकर ट्रॉफी (BGT) ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात हायव्होल्टेज लढत मानली जाते. कसोटी क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ या मालिकेत एकमेकांशी भिडताना दिसतात. येत्या २२ नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा या ट्रॉफीचे थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. पहिलीच कसोटी पर्थच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. तर भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्धच्या खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियात आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) मध्ये स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी फारच महत्त्वाची असणार आहे. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर ०-३ असा व्हाईटवॉश केल्यानंतर भारताची अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा कमी झाली आहे. पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली कामगिरी करण्याचे संघाचे शर्थीचे प्रयत्न असतील.

हेही वाचा – Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट

भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू न्यूझीलंडविरूद्ध कसोटीत सपशेल फेल ठरले. त्यामुळे बॉर्डर गावसकर मालिकेतील कामगिरी या खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कर्णधार रोहितने किवीविरुद्ध सहा डावात ९१ धावा केल्या तर कोहलीने फक्त ९३ धावा केल्या आहेत. या दोघांच्या अपयशामुळे दोघांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांनी टी-२० मधून निवृत्ती घेतली.

हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?

विशेष म्हणजे, बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा इतिहास पाहता, सहा भारतीय दिग्गजांनी या प्रतिष्ठित मालिकेत आपापल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळली.

१. अनिल कुंबळे – ऑस्ट्रेलिया दिल्ली, २९ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर, २००८

२. सौरव गांगुली – ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर, ६-1१० नोव्हेंबर २००८

३. राहुल द्रविड – ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेड, २४-२८ जानेवारी, २०१२

४. व्हीव्हीएस लक्ष्मण – ऑस्ट्रेलिया ॲडलेड, २४-२८ जानेवारी, २०१२

५. वीरेंद्र सेहवाग – ऑस्ट्रेलिया, हैदराबाद, २-५ मार्च २०१३

६. एमएस धोनी – ऑस्ट्रेलिया मेलबर्न, २६-३० डिसेंबर, २०१४

येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या संघामध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ३८ वर्षांचा सर्वात जास्त वय असलेला खेळाडू आहे, त्यानंतर रोहित ३७ वर्षांचा आहे, तर कोहली आणि जडेजा दोघेही ३५ वर्षांचे आहेत.

Story img Loader