Asian Games 2023: अनुभवी हॉर्स रायडर विकास कुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकला नाही. तो तयारीसाठी फ्रान्सला गेला होता पण परदेशी प्रशिक्षकाला पैसे न दिल्याने फ्रान्समधील त्याची तयारी थांबवण्यात आली आहे. विकास आणि मेजर अपूर्व दाभाडे हे परदेशी प्रशिक्षक रोडॉल्फ शेरर यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्समधील सेंट-ग्रेव्हज येथे जूनपासून आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करत आहेत. परदेशी प्रशिक्षकाला पैसे न दिल्याने त्याने त्यांच्याकडील दोन्ही घोडे परत घेतले आहेत त्यामुळे त्यांची तयारी थांबली आहे. दोन्ही रायडर्सनी क्रीडा मंत्रालयाला विनंती केली आहे की त्यांनी प्रशिक्षकांना पैसे द्यावे आणि त्यांची तयारी लवकरात लवकर पुन्हा सुरू करावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईचे स्वप्न पूर्ण करायचे

बुलंदशहर केद्रोली गावातील विकास कुमार व्यतिरिक्त अपूर्व, आशिष लिमये, राजू कुमार आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. चारही हॉर्स रायडर्सला सेंट ग्रेव्हिसला तयारीसाठी पाठवण्यात आले होते, पण ३० जुलैपासून विकास, अपूर्व यांची तयारी थांबली आहे, तर आशिष, राजू त्यांच्या अॅडव्हर्टायझिंगमधून (प्रायोजकाने) दिलेल्या पैशातून तयारी करत आहेत. विकासने बोलताना सांगितले की, “ही आशियाई स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला तेथे पदक जिंकायचे आहे.”

हेही वाचा: Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या शॉटने चिमुरडी गंभीर जखमी, सामन्यानंतर कर्णधाराने दिली खास भेट; पाहा Video

ही चर्चा मृत्यूच्या एक दिवस आधी झाली

विकासने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई रोझी देवी यांचे ११ जून रोजी निधन झाले. १० जून रोजी त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर बोललो होतो. एशियाडसाठी चांगली तयारी करा, असे ती सांगत होती. तिला आपल्या मुलाने आशियाई स्पर्धेत पदक जिंकलेले पाहायचे आहे. विकास सांगतो की, “२०१८च्या आशियाई गेम्समध्ये बुलंदशहरचाच रायडर राकेश कुमारने पदक जिंकले होते. गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जर त्याने एशियाड पदक जिंकले तर त्याचेही गावात असेच स्वागत व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती, पण दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. आईच्या स्वप्नासाठी त्याने येथे येऊ नये आणि तेथेच तयारी करावी, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने व्हिडीओमध्येच आईचे अंतिम संस्कार पाहिले आणि तिला श्रद्धांजली वाहिली.”

हेही वाचा: WC 2023: घरी बसून नव्हे तर मैदानात विश्वचषकाचे सामने पाहायचे आहेत तर, प्रत्येक चाहत्याने ‘ही’ तारीख लक्षात ठेवलीच पाहिजे

पैसे मिळताच प्रशिक्षक पाठवला जाईल

विकास पुढे म्हणतो की, “त्याला आता आईसाठी पदक जिंकायचे आहे. त्याची तयारी लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती दोघांनी ईमेलमध्ये केली आहे. वास्तविक ज्या घोड्यांसोबत दोघांना एशियाडमध्ये खेळायचे आहे.” त्याला रॉडॉल्फने कामावर ठेवले आहे. भाडे न भरल्याने रॉडॉल्फ यांनी घोडे परत घेतले आहेत. ईएफआयचे सरचिटणीस जयवीर सिंग यांनी कबूल केले की, त्यांच्या वतीने रॉडॉल्फला पैसे पाठवले गेले नाहीत. मंत्रालयाच्या मदतीने त्यांनी फ्रान्समध्ये घोडेस्वारांसाठी दोन महिन्यांच्या शिबिराचे आयोजन केले. मंत्रालयाकडून पैसे आल्यानंतर पहिल्या महिन्यात त्यांनी प्रशिक्षकाला पैसे पाठवले, मात्र रक्कम न निघाल्याने दुसऱ्या महिन्यात पैसे पाठवू शकले नाहीत. त्यांनी मंत्रालयाशी चर्चा केली आहे. पैसे मिळताच पाठवले जातील, असे आश्वासन क्रीडा मंत्रालयाने दिले. मात्र, अजूनही पैसे मिळाले नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Both horse associations have requested the sports ministry to pay the trainers and start their preparations avw