कोटलाच्या खेळपट्टीवर १५० ते २०० धावाही करणे आव्हानात्मक होते, मात्र आमच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली, असे ऑस्ट्रेलियाचा प्रभारी कर्णधार शेन वॉटसन याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘या कसोटीत शेवटपर्यंत चिवट झुंज पाहायला मिळाली. आम्ही विजय मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तथापि, चेतेश्वर पुजाराने झुंजार खेळ करीत आमच्या आशा धुळीला मिळविल्या.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘आमच्या संघात बरेचसे खेळाडू अननुभवी होते. त्यांच्यासाठी ही कसोटी मालिका बरेच काही शिकवणी देणारी ठरली आहे. प्रत्येक आघाडीवर आम्हाला भरपूर शिकायला मिळाले आहे. घरच्या मैदानापेक्षा परदेशातील खेळपट्टी व वातावरणात खेळण्याची संधी मिळाली की खेळाडू आपोआप तयार होतात.’’ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा