न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनने वंशविद्वेष आणि लैंगिकतेबद्दलच्या जुन्या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 27 वर्षीय रॉबिन्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या दिवशी आठ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटची मला लाज वाटते. ते ट्विट आज सार्वजनिक झाले आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की मी वर्णद्वेषी किंवा लिंगभेदाचा समर्थक नाही.”
रॉबिन्सन म्हणाला, “माझ्या कृतीबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि अशा टिप्पण्या केल्यामुळे मला लाज वाटते. त्यावेळी मी विचारहीन आणि बेजबाबदार होतो. तेव्हा माझी मनःस्थिती कशीही असेल पण ते माफीयोग्य नव्हती. मात्र मी आता विचारांनी परिपक्व झालो आहे.”
रॉबिन्सनने २०१२ आणि २०१४ मध्ये काळे, मुस्लिम, महिला आणि आशियाई लोकांविरूद्ध आक्षेपार्ह भाष्य केले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी बोर्ड वर्णद्वेषाविरूद्ध शून्य-सहिष्णुता धोरण स्वीकारत असल्याचे म्हटले.
ते म्हणाले, “इंग्लंडच्या एका क्रिकेटपटूने अशी ट्वीट केल्याबद्दल मी किती निराश आहे हे व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. कोणतीही व्यक्ती, विशेषत: महिला किंवा कृष्णवर्णीय व्यक्ती, क्रिकेट आणि क्रिकेटर्ससाठी हे शब्द वाचल्यानंतर जी भावना एखाद्याच्या मनात निर्माण होईल ती पूर्णपणे अस्वीकार्य आहे”
रॉबिन्सन मैदानात असताना ही ट्वीट सोशल मीडियावर शेअर केली जात होती. यादरम्यान त्याने ५० धावा देऊन दोन बळी घेतले. त्याने टॉम लाथम आणि रॉस टेलरला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. तो म्हाणाला “आज मैदानावरील माझ्या कामगिरीबद्दल आणि इंग्लंडकडून होणाऱ्या कसोटी सामन्याबाबत चर्चा व्हायला हवी होती, परंतु माझ्या पूर्वीच्या वागण्याने त्याच्यावर पाणी फेरले.”