सोफिया येथे १४ ते २४ एप्रिलदरम्यान विश्वचषक युवा बॉक्सिंग स्पर्धा होत असून, या स्पर्धेद्वारे युवा ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत.
नानजिंग (चीन) येथे ऑगस्टमध्ये युवा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. त्यादृष्टीने युवा बॉक्सिंग स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळविणारा खेळाडू युवा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बंदी घातली असल्यामुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या ध्वजाखाली सहभागी होत आहेत.
भारतीय संघ: मुले- शामकुमार काकरा (४९ किलो), गौरव सोळंकी (५२ किलो), कार्तिक सतीशकुमार (५६ किलो), संदीपकुमार (६० किलो), नीरज पराशर (६४ किलो), मनजीत (६९ किलो), नीलकमलसिंग (७५ किलो). प्रशिक्षक- जी.मनोहरन, सी.रामानंद मुली- निखत झरीन (५१ किलो), जमुना बोरो (६० किलो), मंजु बाम्बोरिया (७५ किलो).
युवा ऑलिम्पिक निकषासाठी भारतीय बॉक्सर उत्सुक
सोफिया येथे १४ ते २४ एप्रिलदरम्यान विश्वचषक युवा बॉक्सिंग स्पर्धा होत असून, या स्पर्धेद्वारे युवा ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत.
First published on: 10-04-2014 at 04:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boxers target medals olympic quota spots at youth wc