बॉक्सिंग या खेळावर सध्या नियंत्रण असलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनीच निवडणुकीच्या नियमांमध्ये आपल्याला अनुकूल बदल केल्याचा आरोप काही संघटकांनी केला आहे. नागालँड हौशी बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस टी. मेरेन पॉल यांनी बॉक्सिंग इंडियाला पत्र लिहून काही नियमांबाबत आक्षेप घेतला आहे. याआधी महासचिवपदासाठी रिंगणात असलेल्या राकेश ठाकरन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जय कवळी यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. हरयाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाकरन यांनी कवळी यांच्या अर्जात अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader