नेमबाजीप्रमाणे बॉक्सिंग हा खेळ भारताला ऑलिम्पिक पदकापर्यंत मजल मारून देऊ शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे या खेळाकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. गेल्या दशकभरातील भारताची बॉक्सिंगमधील कामगिरी थक्क करणारी आहे. याच जोरावर २०१६च्या रिओ
भारतीय बॉक्सिंगला खरी कलाटणी मिळाली ती १९७२च्या आशियाई स्पर्धामध्ये. कदम बहादूर बग याने सुवर्णपदक पटकावतानाच स्पर्धेतील सर्वोत्तम बॉक्सरचा किताब पटकावला. त्यामुळे जगाला भारतीय बॉक्सिंगची दखल घेणे भाग पडले. १९८६च्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारताने ३७ पदके मिळवली, त्यात बॉक्सिंगचा वाटा होता ९ पदकांचा. महाराष्ट्राच्या शाहू बिराजदार आणि मनोज पिंगळे यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने बॉक्सिंगची दखल घेत या खेळाला देशातील सर्वाधिक नऊ आवडत्या क्रीडाप्रकारांमध्ये स्थान दिले. त्यामुळेच बॉक्सिंगची जडणघडण वेगळ्या रीतीने होत गेली. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताला त्याचा प्रत्यय आला असता. पण गुरचरण सिंगचे कांस्यपदक एका गुणाने हुकले. २००१ साली झालेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीत हरयाणाचे राजकीय नेते अभयसिंग चौटाला यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्यानंतर बॉक्सिंग खेळाचा आलेख उंचावत गेला. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने तर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एम. सी. मेरी कोम हिने कांस्यपदक मिळवत भारतीय बॉक्सिंगला ‘चार चाँद’ लावले. चौटाला यांच्या कारकिर्दीत भारताने ही शिखरे पादाक्रांत
केली.
चौटाला यांनी आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत चांगले काम करून सर्वाची मने जिंकली. चौटाला यांना सर्व राज्य बॉक्सिंग संघटनांनी पाठिंबा दर्शवला. पण क्रीडा मंत्रालयाच्या आचारसंहितेमुळे चौटाला संकटात सापडले. १२ वर्षे अध्यक्षपदाची सत्ता उपभोगल्यानंतर पुढील चार वर्षांच्या कालावधीसाठी चौटाला यांना खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले होते. पण सत्तालालसेपोटी चौटाला यांनी २०१२च्या निवडणुकीत कुणालाही विश्वासात न घेता थेट अध्यक्षपदासाठी आपले मेहुणे आणि राजस्थानचे आमदार अभिषेक मटोरिया यांची नेमणूक करून सर्वानाच धक्का दिला. खरे तर चौटाला यांनी बॉक्सिंगच्या हितासाठी वर्षांनुवर्षे मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांपैकी एकाची निवड अध्यक्षपदी करायला हवी होती. पण चौटाला यांना हीच घोडचूक भोवली. पतियाळामध्ये झालेल्या या निवडणुकीनंतर बॉक्सिंगमधील चळवळींना सुरुवात झाली. सुरुवातीला भारतीय बॉक्सिंग महासंघावर बंदी घालण्यात आल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने थेट महासंघाची मान्यताच काढून घेतली आहे.
भारतात जवळपास सर्वच खेळांमध्ये राजकीय आणि भ्रष्ट लोकांचा वावर मुक्तपणे आढळतो. कोणताही खेळ त्याला अपवाद नसावा. त्यामुळे खेळात राजकारण, घोटाळे आणि गैरव्यवहार हे ओघाने आलेच. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतातील क्रीडा संघटनांवर कार्यरत असलेल्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने भारतीय बॉक्सिंग महासंघावर केलेली कारवाई हे त्याचेच फलित होते. आता नवी कार्यकारिणी तयार करण्यासाठी वेगवेगळे गट कार्यरत झाले आहेत. अनेक राज्य संघटनांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. पण महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने कोणत्याही आमिषाला बळी न पडता या बैठकींना उपस्थित न राहण्याची भूमिका घेतली आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव पी. के. मुरलीधरन राजा हे गेल्या आठ वर्षांपासून चौटाला यांच्या खांद्याला खांदा भिडवून भारतीय बॉक्सिंगच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण चौटाला यांची डाळ शिजणार नाही, हे लक्षात आल्यानंतर मुरलीधरन राजा यांनी वेगळी चूल मांडण्याचे ठरवले आहे. त्यांनी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगला आपल्या गटात सामील करून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून निशाणा साधण्याचे ठरवले आहे.
वर्षअखेरीस रिओ ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धाना सुरुवात होणार आहे. सध्या भारतीय बॉक्सर्स आंतरराष्ट्रीय बॉक्िंसग महासंघाच्या झेंडय़ाखाली प्रतिनिधित्व करत असले तरी भारताला लवकरात लवकर ऑलिम्पिक मान्यता मिळवावी लागणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर निवडणुका घेऊन विश्वासू, प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान द्यावे लागेल. बॉक्सिंगच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आणि बॉक्सिंग खेळासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीवर परतण्याची हीच योग्य संधी आहे.
बॉक्सिंगचा पंचनामा!
नेमबाजीप्रमाणे बॉक्सिंग हा खेळ भारताला ऑलिम्पिक पदकापर्यंत मजल मारून देऊ शकतो, हे आता सिद्ध झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-03-2014 at 06:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boxing india knocked out