बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनची प्रतिमा क्रिकेटचा बॅड बॉय बनत चालली आहे. कारण त्याच्या चुकांपासून शिकण्याऐवजी तो त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसतो. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये तो पुन्हा एकदा वाद घालताना दिसला. तो पंचाशी भांडताना दिसला. लाइव्ह मॅचमध्ये त्याने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह तर उपस्थित केले, पण गोंधळही केला. मात्र, त्याच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही. यापूर्वीही शाकिब पंचांशी वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे.

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बरीशालचा सामना सिलहीड स्ट्रायकर्सविरुद्ध होता. या सामन्यात शाकिब बरीशालच्या संघाचा एक भाग होता, ज्याला १९४ धावांची मोठी खेळी करूनही ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. शाकिबची अतुलनीय खेळीही बारिसालच्या पराभवात व्यर्थ गेली. पण, इथे प्रश्न संघाच्या विजय किंवा पराभवाचा नसून शाकिबने निर्माण केलेल्या गोंधळाचा आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
He asked me if I was still taking drugs Alex Hales accuses Tamim Iqbal after during BPL 2025 final controversy
BPL 2025 : ‘तू अजूनही ड्रग्ज घेतोस का?’, सामन्यानंतर तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्समध्ये मैदानातच जुंपली
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
Jasprit Bumrah Faces Shocking Accusation of Using Sandpaper During Sydeney Test by Australian Fans Video
IND vs AUS: जसप्रीत बुमराहवर बूटमध्ये सँडपेपर लपवल्याचा ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आरोप; व्हायरल VIDEO मुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बरीशालच्या डावातील १६व्या षटकातील घटना –

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बरीशालच्या डावाचे १६ वे षटक सुरू होते. स्ट्रायकर्सचा गोलंदाज रेजर रहमान गोलंदाजी करत होता. त्याने ओव्हरचा चौथा चेंडू टाकला जो शाकिबच्या मते वाईड होता. पण, तिसऱ्या पंचाने त्याला वाईड देण्यास नकार दिला. यावर शाकिब संतापला.

शाकिबने पंचांशी घातली हुज्जत –

शाकिब रागाने ओरडत पंचांकडे गेला. तसेच त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. त्याच्या जोरदार वादानंतरही निर्णयात फरक पडला नाही. परंतु तो पुन्हा एकदा पंचांशी वाद घालण्यासाठी कुप्रसिद्ध झाला.

हेही वाचा – IND vs SL T20: गौतम गंभीरने सूर्यकुमारसाठी ट्विट केल्याने संतापले चाहते; म्हणाले, तुझ्याकडून ‘हे’ अपेक्षित नव्हते

शाकिबचा पंचांशी लढण्याचा जुना इतिहास –

शाकिबने पंचांशी अशाप्रकारे गैरवर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जून २०२१ मध्ये ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळताना तो स्टंप पाय उडवत पंचाकडे धावला होता. तसेच, नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या निर्णयाचा निषेध करत त्याने पंचांशी हुज्जत घातली होती.

शाकिब किती दिवस एकच चूक पुन्हा करणार?

हेही वाचा – IND vs SL T20: सूर्यकुमार यादवचा नवा विश्वविक्रम: ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

बांगलादेश प्रीमियर लीग २०२३ नुकतीच सुरू झाली आहे, त्यात शाकिबची ही अवस्था आहे. प्रत्येक सामन्याने स्पर्धा तापत असताना बांगलादेशी अष्टपैलू खेळाडूंच्या स्वभावाचे काय होईल? आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शाकिब अल हसन त्याच्या चुकांमधून कधी धडा घेईल की तो त्याची पुनरावृत्ती करत राहील.

Story img Loader