BPL 2025 Mahedi Hasan obstructing the field wicket : बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एक मजेशीर ड्राम पाहायला मिळाला. रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्युन बरीशाल यांच्यातील सामना चुरशीची झाला. यासोबतच सामन्यात असे काही पाहायला मिळाले, जे क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. रंगपूरचा फलंदाज महेदी हसनला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्वात फलंदाजाची कोणतीही चूक नसताना, त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रंगपूरच्या डावातील १९व्या षटकात महेदीने आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या वरच्या काठावर लागला आणि तिथेच हवेत उंच उडाला. यानंतर गोलंदाज जहांदाद खान झेल घेण्यासाठी धावला, तसेच दोन्ही फलंदाज धाव घेण्यासाठी धावले. यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहांदादला पाहून नॉन स्ट्रायकर नुरुल हसनने मुद्धा सरळ रेषेत धावण्याऐवजी मुद्दाम खेळपट्टीच्या दिशेने धाव घेतली. ज्यामुळे झेल घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोलंदाजाला अडथळा निर्माण झाला. ज्यामुळे त्याला झेल घेता आला नाही.

महेदी हसनच्या विकेटचा व्हिडीओ –

यानंतर गोलंदाज जहांदादने झेल घेण्यासाठी फलंदाजाने अडथळा निर्माण केल्याने आऊटची अपील केलं. त्यामुळे मैदानी अंपायर अली अरमान आणि आसिफ याकूब यांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला. टीव्ही अंपायर तनवीर अहमद यांनी महेदीला आऊट घोषित केलं. अंपायर तनवीरचा निर्णय क्रिकेटच्या ३७.३.१ कायद्यानुसार होता. हा नियम सांगतो की, जर चेंडू नो-बॉल नसेल आणि जर कोणत्याही फलंदाजाने जाणीवपूर्वक क्षेत्ररणात अडथळा आणला किंवा लक्ष विचलित करून झेल घेण्यापासून रोखले, तर स्ट्रायकर फलंदाजाला आऊट घोषित केले जाते.

हेही वाचा – Manoj Tiwary : ‘गौतम गंभीर ढोंगी…’, माजी खेळाडू मनोज तिवारीची भारतीय संघाच्या कोचवर टीका; म्हणाला, ‘तो जे बोलतो ते…’

शेवटी खलनायकच ठरला नायक –

या सामन्याची दिशा अनेक वेळा बदलली. बारिशालला शेवटच्या तीन षटकात ४२ धावांची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने १८व्या षटकात केवळ तीन धावा दिल्या आणि इफ्तिखार अहमदची (३६ चेंडूत ४८ धावा) विकेट घेतली. त्यामुळे अखेरच्या दोन षटकांत बारिशाला ३९ धावांची गरज होती. जहांदाद खानच्या पुढच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर खुशदिल शाहने षटकार ठोकला. मात्र जहांदादने खुशदिलला महमुदुल्लाहवी झेलबाद केले. मेहदी बाद झाल्यानंतर रंगपूरला आता ७ चेंडूत २६ धावांची गरज होती. अखेरच्या षटकात नुरुल हसनने काइल मेयर्सच्या षटकात तीन षटाकर आणि तीन चौकार मारून दमदार विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bpl 2025 mahedi hasan was given out obstructing the field for non strikers nurul hasan mistake video viral vbm