BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan Fight : सध्या बांगलादेशमध्ये बीपीएल २०२५ (बांगलादेश प्रीमियर लीग) चा हंगामा खेळवला जात आहे. या स्पर्धेतील १७ वा सामना खुलना टायगर्स आणि सिल्हेट स्ट्रायकर्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये सिल्हेट स्ट्रायकर्सने ८ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात दोन्ही संघातील तंझीम हसन साकिब आणि मोहम्मद नवाझ यांच्यात धक्काबुकी झाल्यानंतर वाद घालतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक, जेव्हा खुलना टायगर्स आणि सिल्हेट स्ट्रायकर्स यांच्यात सामना सुरू होता, तेव्हा तंझीम हसन साकिब गोलंदाजी करत होता आणि त्याच्यासमोर मोहम्मद नवाझ फलंदाजी करत होता. त्यानंतर तंझीमच्या एका संथ चेंडूवर नवाझने त्याची विकेट गमावली. त्यानंतर तंजीम नवाच्या दिशेने गेला असता, दोघांचे खांदे एकमेकांना धडकले. यावरून दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी झाली.

इतकेच नाही तर तंझीमने नवाजला ड्रेसिंग रुमकडे जाण्याचा इशाराही दिला, त्यानंतर इतर खेळाडू आणि अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात मोहम्मद नवाजने फलंदाजी करताना ३३ धावा केल्या.

हेही वाचा – Rohit Sharma : ‘नवा कर्णधार शोधा…’, आढावा बैठकीत रोहित शर्माने बीसीसीआयकडे मागितली काही महिन्यांची मुदत?

सिल्हेट स्ट्रायकर्सने मारली बाजी –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिल्हेट स्ट्रायकर्स संघाने २० षटकात ५ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. सिल्हेट स्ट्रायकर्सकडून फलंदाजी करताना झाकीर हसनने ४६ चेंडूत सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. या खेळीत झाकीरने ६ षटकार आणि ३ चौकार लगावले. याशिवाय रॉनीने ४४ चेंडूत ५६ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र

यानंतर १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खुलना टायगर्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाने पॉवरप्लेमध्ये ४७ धावांत तीन गडी गमावले होते. यानंतर टायगर्सने सातत्याने विकेट्स गमावल्याने त्यांना २० षटकात ९ गडी गमावून १७४ धावाच करता आल्या. ज्यामुळे त्यांना ८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या संघासाठी खुलना टायगर्सकडून खेळताना विल्यमने सर्वाधिक ४३ धावांची खेळी खेळली. सिलहेट स्ट्रायकर्सकडून गोलंदाजी करताना तंझीम, रीस टोपले आणि रुएल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.