Brad Hogg says Gujarat Titans do not miss Hardik Pandya : आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात होण्यास १० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. हार्दिक पंड्या या स्पर्धेच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडूच्या नेतृत्वाखाली गुजरातने आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूने गुजरातच्या माजी कर्णधाराबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ब्रॅड हॉगने हार्दिक पंड्या सोडून गेल्यामुळे गुजरातला काही फरक पडेल की नाही? यावर आपले मत मांडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातला हार्दिकची उणीव भासणार नाही –

गुजरात टायटन्सला हार्दिक पंड्याची उणीव भासू शकते, असे मानले जात आहे. मात्र, स्टार अष्टपैलू खेळाडू नसतानाही संघ चांगल्या स्थितीत असल्याचे अनुभवी गोलंदाज ब्रॅड हॉगने म्हटले आहे. हार्दिकचे संघात नसणे हे फार मोठे नुकसान नाही, असे माजी क्रिकेटपटूचे मत आहे.
माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ब्रॅड हॉग म्हणाला, “मला वाटत नाही की हार्दिक पंड्याने साथ सोडल्यामुळे गुजरातची खरोखरच इतके मोठे नुकसान झाले आहे. होय, तो मधल्या फळीतील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु ते कव्हर करू शकतात. त्यांच्याकडे खरोखर चांगले गोलंदाज आहेत. तो क्रमवारीत वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी करायचा, परंतु मला वाटत नाही की तो तिथे फिट होता, त्यामुळे त्याच्याशिवाय संघ अधिक चांगला आहे.”

ब्रॅड हॉगने मुंबईला दिला खास सल्ला –

ब्रॅड हॉगने मुंबईला हार्दिकला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवण्याचा सल्ला दिला. तो पुढे म्हणाला, “मुंबईसाठी भारतीय अष्टपैलू खेळाडूला खालच्या क्रमावर फलंदाजी करायला लावणे चांगले आहे आणि मला वाटते की हार्दिक येथे फलंदाजी करेल. मला वाटते की आपण मुंबई इंडियन्ससोबत हार्दिकला त्याची सर्वोत्तम कामगिरीत करताना पाहू.”

हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आयपीएलपूर्वी मोठा धक्का! सुरुवातीच्या काही सामन्यांना ‘हा’ स्टार खेळाडू मुकणार?

भारतासाठी, हार्दिकने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ९२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३४८ धावा आणि ७३ बळी घेतले आहेत. २०१५ मध्ये त्याने मुंबईसाठी पदार्पण केले होते. त्याने ९२ आयपीएल सामन्यांमध्ये पंड्याने १४७६ धावा केल्या आहेत आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brad hogg says gujarat titans do not miss hardik pandya leaving in ipl 2024 vbm