राफेल बेनिटेझ यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रिअल माद्रिद संघाने आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पध्रेत सोमवारी इंटरनॅझिओनल क्लबवर ३-० असा दमदार विजय साजरा केला. बेनिटेझ यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा खेळणाऱ्या जेम्स रॉड्रिग्जने ८८व्या मिनिटाला फ्री-किकद्वारे गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या माद्रिने मध्यंतरापर्यंत सामन्यावरील पकड घट्ट केली होती. त्यांच्या आक्रमणासमोर यजमान संघ हतबल झाला. जेसे रॉड्रिग्जने २९व्या मिनिटाला पहिला गोल करून माद्रिला मध्यंतरापर्यंत १-० असे आघाडीवर ठेवले. ५६व्या मिनिटाला त्यात राफील व्ॉराने याने गोल करून ही आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर इंटरनॅझिओनल संघाकडून आक्रमक खेळ झाला. त्यांनीही गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु माद्रिच्या गोलरक्षकाने त्या हाणून पाडल्या.

Story img Loader