फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान ब्राझीलमधील निदर्शकांचा धोका लक्षात घेता स्पर्धेच्या संयोजकांनी तब्बल एक लाख ५७ हजार सैनिक आणि पोलिसांची फौज तैनात केली आहे. ब्राझीलमधील सुरक्षा मंत्रालयाने स्पर्धेच्या सुरक्षेकरिता ३२२ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. सुरक्षा मंत्रालयाने या स्पर्धेकरिता नौदल, हवाईदल आणि सेनादलाचे ५७ हजार जवान तसेच आपत्कालीन स्थितीसाठी २१ हजार जवानांची फौज तैनात केली आहे.
न्यायमंत्री जोस एड्वाडरे काडरेझो म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षी कॉन्फेडरेशन चषकात घडलेला प्रकार फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यानही घडण्याचा धोका आहे. अलीकडेच काही निदर्शक ब्राझील सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने निदर्शकांची संख्या कमी असली तरी आम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी सज्ज आहोत.’’
विश्वचषकासाठी दीड लाख सैनिकांची फौज
फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान ब्राझीलमधील निदर्शकांचा धोका लक्षात घेता स्पर्धेच्या संयोजकांनी तब्बल एक लाख ५७ हजार सैनिक आणि पोलिसांची फौज तैनात केली आहे.
First published on: 25-05-2014 at 10:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazil deployed 1 5 lakh army for fifa world cup