कोलंबिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान ब्राझलने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कोलंबियावर २-१ ने मात करून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
सामन्याच्या ७व्याच मिनिटाला नेयमार लगावलेल्या ‘कॉर्नर किक’वर ब्राझीलचा कर्णधार सिल्वाने शानदार गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली.
सामन्याचा हिरो ठरला डेव्हीड लुइस. ६९व्या मिनिटाला लुइसने लागावलेल्या ‘फ्री किक’ने कोलंबियन बचावाच्या सर्व अडथळ्यांना बाजूला सारून फुटबॉलने थेट गोलपोस्टमध्ये धडक मारली आणि ब्राझीलच्या खात्यात दुसऱ्या गोलची नोंद झाली.
संपूर्ण स्टेडियमवर ब्राझीलीयन जल्लोष सुरू होता. तर, कोलंबिया संघही आत्मविश्वास न गमावता कडवी टक्कर देत होता. त्यात गोल अडविण्यासाठी सरसावलेला ब्राझीलचा गोलरक्षक सेसारने कोलंबियाच्या खेळाडूला पाडल्याने पंचांनी त्याला पिवळ कार्ड दर्शविले आणि ‘पेनल्टी किक’ची संधी कोलंबियाकडे चालून आली. आघाडीवीर जेम्स रॉड्रिगेझने या संधीला शानदार गोलमध्ये रुपांतरीत करून कोलंबियाचे खाते उघडले. त्यानंतर कोलंबियाने झुंज देण्याचा प्रयत्न केला परंतु, ब्राझेलीयन बचावफळीला भेदण्यात कोलंबियन खेळाडूंना यश आले नाही. ब्राझीलसाठी खेदाचीबाब अशी की, सामन्यात अखेच्या क्षणी ‘ब्राझेलीयन स्टार’ नेयमारच्या पाठीला दुखापत झाली आहे.
आता उपांत्यफेरीत ८ जुलैला ब्राझीलची लढत जर्मनीशी होणार आहे.

Story img Loader