ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती आणखीन बिघडल्यामुळे त्यांना साव पावलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. पेले यांच्यावर १३ नोव्हेंबर रोजी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पेले यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयामार्फत सांगण्यात आले असले तरी तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या पेले यांची प्रकृती खालावली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ब्राझीलतर्फे ९२ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना पेले यांनी विक्रमी ७७ गोल लगावले आहेत.

Story img Loader