कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलने चार गोल करून चांगलाच सराव करून घेतला. सध्या ब्राझीलच भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात सरस आहे. ब्राझीलचा भाव आता वधारला आहे. भारतीय सट्टेबाजांनी ब्राझीलच पुन्हा विजेता होणार यासाठी ३५ पैसे देऊ केले आहेत. त्याखालोखाल जर्मनी (४० पैसे) आणि अर्जेंटिना (४५ पैसे) आहे. गेल्या आठवडय़ात याच सदरात दिलेला भाव आजही कायम आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात बेट फेअर, बेट ३६५, बेटस्ट्रेट, बेटविन, युनिबेट, विल्यमस्, पॅडीपॉवर, स्काय बेट आदी सर्वच प्रमुख संकेतस्थळांनी ब्राझीललाच प्राधान्य दिले आहे. स्पेनने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ३-० असा विजय मिळविला. हा सामना अनिर्णीत राहिला असता तर कदाचित सट्टेबाजांना मोठा फटका बसला असता. नेदरलँडनेही आपली घोडदौड सुरू ठेवल्यामुळे सट्टेबाजारात फारशी हालचाल नाही. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्थातच अर्जेटिना, फ्रान्स यांच्यासाठी सट्टेबाजांनी ‘रेड कार्पेट’ उपलब्ध करून दिले आहे. गोलकर्त्यांमध्ये पुन्हा चढाओढ निर्माण झाली आहे. आता नेयमार, करीम बेन्झेमा, थॉमस मुल्यर, लिओनेल मेस्सी आणि रॉबीन व्हान पर्सी असा क्रम आहे.
आजचा भाव :
बोस्निया                               इराण
७० पैसे (११/९)          पावणेदोन रुपये (१३/५)
नायजेरिया                           अर्जेंटिना
साडेतीन रुपये (१५/२)      ३५ पैसे (३/५)
इक्वेडोर                               फ्रान्स
सव्वा दोन रुपये (१५/४)     ६० पैसे (१३/१५)
होंडुरास                             स्वित्झर्लंड
पाच रुपये (८/१)              ४० पैसे (५/११)

Look who’s playing centre-Barack! World Cup mug
World Cup mug , Barack Obama, Brazil, footbal world cup 2014, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi  
कप-शप : .. आणि बराक ओबामा कपवर अवतरले!

माणसाकडून कशी आणि कधी चूक होईल, हे सांगता येत नाही. फिफा विश्वचषकाचे साहित्य पुरवण्याची जबाबदारी ‘डोरसेट’ या कंपनीला देण्यात आली होती. कॉफीच्या कपवर फोटो छापण्यासाठी इंग्लंडच्या तीन खेळाडूंचे फोटो त्यांना देण्यात आले होते. खेळाडूंचा चेहरा कापून तो कपवर चिकटवायचा होता. कपवर फोटो छापून तयार झाले. पण या सर्व साहित्याचे निरीक्षण करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. कपवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा फोटो असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ख्रिस स्मॉलिंगचा फोटो छापण्याऐवजी तब्बल २००० कपवर बराक ओबामा यांचा फोटो झळकला होता. त्यानंतर बराच वादंग माजला होता. पण आजही हा कप एक युरोला विकत मिळत आहे. ज्या चुकीमुळे बराक ओबामा यांचा फोटो छापला गेला, तशीच कामगिरी इंग्लंडची या स्पर्धेत झाली, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

शूट आऊट : युद्ध अमुचे सुरू..
सध्या ब्राझीलच्या रणांगणावर ३२ संघांमध्ये युद्ध रंगले आहे. त्यापैकी पहिल्या फेरीच्या युद्धात विजय मिळवणाऱ्या १६ संघांसाठी जेतेपदाच्या प्रवासापर्यंत युद्धाला सामोरे जावे लागणार आहे. ‘अ’ गटात क्रोएशिया, कॅमेरूनवर मात करून ब्राझीलविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवणाऱ्या मेक्सिकोने दुसरी फेरी गाठली आहे. मेक्सिकोच्या संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या चाहत्यांनी ढालीवर फुटबॉलचे चित्र रंगवले असून ‘युद्ध अमुचे सुरू’ हेच ते दर्शवित आहेत.

गोलमीटर
सर्वाधिक गोल करणारे खेळाडू
खेळाडू                    देश            गोल
नेयमार                राझील            ४
करिम बेंझेमा       फ्रान्स             ३
थॉमस म्युलर       जर्मनी            ३
आर्येन रॉबेन       नेदरलँड्स         ३
इनेर व्हॅलेंसिया    इक्वेडोर           ३
रॉबिन व्हॅन पर्सी   नेदरलँड्स       ३