कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलने चार गोल करून चांगलाच सराव करून घेतला. सध्या ब्राझीलच भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात सरस आहे. ब्राझीलचा भाव आता वधारला आहे. भारतीय सट्टेबाजांनी ब्राझीलच पुन्हा विजेता होणार यासाठी ३५ पैसे देऊ केले आहेत. त्याखालोखाल जर्मनी (४० पैसे) आणि अर्जेंटिना (४५ पैसे) आहे. गेल्या आठवडय़ात याच सदरात दिलेला भाव आजही कायम आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात बेट फेअर, बेट ३६५, बेटस्ट्रेट, बेटविन, युनिबेट, विल्यमस्, पॅडीपॉवर, स्काय बेट आदी सर्वच प्रमुख संकेतस्थळांनी ब्राझीललाच प्राधान्य दिले आहे. स्पेनने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ३-० असा विजय मिळविला. हा सामना अनिर्णीत राहिला असता तर कदाचित सट्टेबाजांना मोठा फटका बसला असता. नेदरलँडनेही आपली घोडदौड सुरू ठेवल्यामुळे सट्टेबाजारात फारशी हालचाल नाही. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्थातच अर्जेटिना, फ्रान्स यांच्यासाठी सट्टेबाजांनी ‘रेड कार्पेट’ उपलब्ध करून दिले आहे. गोलकर्त्यांमध्ये पुन्हा चढाओढ निर्माण झाली आहे. आता नेयमार, करीम बेन्झेमा, थॉमस मुल्यर, लिओनेल मेस्सी आणि रॉबीन व्हान पर्सी असा क्रम आहे.
आजचा भाव :
बोस्निया इराण
७० पैसे (११/९) पावणेदोन रुपये (१३/५)
नायजेरिया अर्जेंटिना
साडेतीन रुपये (१५/२) ३५ पैसे (३/५)
इक्वेडोर फ्रान्स
सव्वा दोन रुपये (१५/४) ६० पैसे (१३/१५)
होंडुरास स्वित्झर्लंड
पाच रुपये (८/१) ४० पैसे (५/११)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा