ब्राझीलला ‘फुटबॉलची पंढरी’ का म्हणतात, याची प्रचीती या देशातल्या प्रत्येकाचा खेळ पाहिल्यावर येतेच. वयोगट कोणतेही असोत त्यांचा खेळ हा वाखाणण्याजोगा असतोच. लहानपणापासूनच त्यांना मिळणाऱ्या बाळकडूमुळेच जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये ब्राझीलच्या खेळाडूंचे वर्चस्व आत्तापर्यंत जाणवले आहे. कुमार गटातील खेळाडूंचे कौशल्य पाहून यापुढेही ते नक्की कायम राहील. पेले, नेयमार, रोनाल्डिन्हो, रोनाल्डो, काका, झिको, रॉबटरे कार्लोस अशी जागतिक फुटबॉलला ब्राझीलने दिलेल्या या दिग्गज खेळाडूंची यादी ही वाढतच राहणार आहे. याच दिग्गजांच्या मांदियाळीत भविष्यात समाविष्ट होणारा कुमार ब्राझीलचा संघ भारतात दाखल झाला आहे. त्यांच्या आगमनापासून मुंबईतील वातावरण ब्राझीलमय झाले आहे. गुरुवारी अंधेरी क्रीडा संकुलात याचीच अनुभूती मुंबईकरांनी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या पूर्वतयारीसाठी ब्राझील आणि न्यूझीलंड यांच्यात सराव सामना खेळवण्यात आला. पन्नासहून अधिक लहान मुलांचा गट पिवळी जर्सी परिधान करून ब्राझीलचे मनोबल उंचावण्यासाठी मुंबई फुटबॉल एरिनावर जमला होता. या सामन्यातील निकालापेक्षा भावी दिग्गज खेळाडू पाहण्याची उत्सुकता सर्वाच्या चेहऱ्यावर जाणवत होती.

प्रमुख खेळाडू व्हिनिशियसच्या अनुपस्थितीतही ब्राझीलचा खेळ उजवा झाला. पहिले सत्र वगळले तर न्यूझीलंडला त्यांचे आक्रमण थोपवण्यात सपशेल अपयश आले. पहिल्या सत्रातील दोन्ही संघांच्या खेळाडूंचा कलात्मक खेळ पाहून यजमान भारतासाठी ही स्पर्धा किती खडतर असेल, याची जाणीव नक्की झाली. ब्राझीलचा अ‍ॅलन, ब्रेनर, विस्ली यांच्या खेळाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दहा क्रमांकाची जर्सी परिधान केलेल्या अ‍ॅलनला प्रेक्षकांनी ‘ब्राझिलियन मेस्सी’ ही उपमा दिली. त्याने या कौतुकाला साजेसा खेळही केला.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर ब्राझीलने त्यांचा आक्रमक खेळ सादर केला. ब्रेनरने दोन गोल करताना ब्राझीलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याला न्यूझीलंडकडून मॅक्स माटाने गोल करून प्रत्युत्तर दिले. सराव म्हणून खेळवण्यात आलेल्या पेनल्टी शूटआउटच्या लढतीतही ब्राझीलने ५-४ अशी बाजी मारली.

ब्राझीलच्या संघात जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्या खेळाचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांच्या मार्क्स अँटोनियोचा खेळ अप्रतिम झाला. त्यांच्या तोडीचा खेळ करता आला, याचे समाधान वाटते आहे. या पराभवाचा आमच्या मनोबलावर परिणाम होणार नाही. आम्ही येथे जिंकण्याच्या निर्धाराने दाखल झालो आहोत आणि या सामन्यातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.  डॅनिएल हेय, न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक

आमच्या खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागेल याची कल्पना होती. न्यूझीलंडचे खेळाडू अधिक ताकदवान आहेत. ही त्यांच्यासाठी उजवी बाब आहे. घाना आणि स्पेन हे संघ कडवी टक्कर देऊ शकतात.  कार्लोस अमेडेयू, ब्राझीलचे प्रशिक्षक

दुखापतींचे ग्रहण..

सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलच्या तीन खेळाडूंना दुखापतीमुळे मैदानावर लोटांगण घालावे लागले. त्यांचा प्रमुख खेळाडू वेस्लीला सामना अध्र्यावर सोडावा लागला. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप कळलेले नाही. न्यूझीलंडच्या खेळाडूंना भारतातील वातावरणाशी जुळवून घेण्यात फार कष्ट घ्यावे लागत आहेत. त्यांचे खेळाडू वारंवार पाण्याची मागणी करत होते.