दोन वर्षांपूर्वी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील धक्कादायक पराभवाला सामोरे गेलेला ब्राझीलचा संघ कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेतील हरवलेली ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र प्रमुख खेळाडू नेयमारशिवाय खेळणार असल्याने त्यांची खरी कसोटी लागणार आहे.
नेयमारसह बचावपटू थिएगो सिल्व्हा आणि डेव्हिड लुईझ, मध्यरक्षक ऑस्कर आणि डॉगलस कोस्टा यांनाही कोपा अमेरिका स्पध्रेत ब्राझीलचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना आपली छाप पाडण्याची संधी आहे.