Video of Brendon McCullum goes viral after Jonny Bairstow’s controversial wicket: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने जॉनी बेअरस्टोला ज्या पद्धतीने बाद केले, ते खेळ भावनेच्या विरुद्ध मानले जात आहे. त्यावरुन सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. इतर अनेक दिग्गजांनी देखील हे खेळ भावनेविरूद्ध सांगितले. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यावर प्रतिक्रिया दिली. यानंतर आता इंग्लंड संघाचा कोच ब्रेंडन मॅकुलमचा एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मात्र, तुम्हाला माहीत आहे का, की १८ वर्षांपूर्वी २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध इंग्लंडचे विद्यमान प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही अशाच प्रकारे एका फलंदाजाला बाद केले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा सहकारी खेळाडू दुसऱ्या फलंदाजाचे अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी जात असताना मॅक्युलम त्याला बाद करतो. अंपायरही आऊट घोषित करतात. मॅक्युलमने केलेला हा रन आऊट खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
ॲशेस मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने ब्रेंडन मॅक्युलमप्रमाणेच जॉनी बेअरस्टोला बाद केले. ज्यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
हेही वाचा – Ashes Series 2023: बेन डकेट मिचेल स्टार्कने झेल घेतल्यानंतरही ‘Not Out’ कसा? एमसीसीने दिले स्पष्टीकरण
बेअरस्टो वादग्रस्तपणे बाद झाला –
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॉनी बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा बाउन्सर चेंडू न खेळता मागे जाऊ दिला. त्यानंतर हा चेंडू यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने पकडला. यानंतर हा चेंडू ‘डेड’ होण्यापूर्वीच जॉनी बेअरस्टो क्रीज सोडून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या आपल्या जोडीदाराकडे गेला, त्याचवेळी यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने या संधीचा फायदा घेतचेंडू स्टंपवर मारला आणि त्याला बाद केले. हे पाहून बेअरस्टो हादरला आणि मैदानावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे बोट दाखवले. रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने त्याला स्टंपिंग आऊट घोषित केले. यानंतर बेअरस्टो निराशेने डोके हलवत पॅव्हेलियनमध्ये परतला.
सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या जोरावरऑस्ट्रेलियाला ९१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या आणि इंग्लडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले, परंतु प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला.