वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराकडून भारताच्या कर्णधाराची प्रशंसा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विलक्षण कामगिरीमुळे विश्वाच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षांव होत आहे. त्यामध्ये आता वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा या महान फलंदाजाचीदेखील भर पडली आहे. सध्याच्या घडीला फक्त कोहलीच क्रिकेटचा सम्राट आहे, अशा शब्दांत लाराने कोहलीची प्रशंसा केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने सलग तीन शतके ठोकली होती. त्याशिवाय एकदिवसीय कारकीर्दीत सर्वात जलद १०,००० धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. ‘‘कोहली सध्या विलक्षण कौशल्याने खेळत असून, धावा करण्याची क्षमता, तंदुरुस्ती आणि अनेक लहानसहान गोष्टींना महत्त्व देण्याची त्याची सवय मला आवडते. त्यामुळे क्रिकेटला कोहलीच्या रूपाने एक नवा चेहरा लाभला आहे,’’ असे कोहलीच्या सध्याच्या कामगिरीविषयी लारा म्हणाला.
मात्र सचिन तेंडुलकर आणि कोहली यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण, या प्रश्नावर लाराने उत्तर देणे टाळले, तो म्हणाला, ‘‘जेव्हा मी आणि सचिन खेळायचो त्या वेळी आमचीही अनेक चाहते तुलना करायचे. मात्र आम्ही त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे कोहलीलादेखील अशा प्रकारच्या तुलनेने काही फरक पडत असेल, असे मला वाटत नाही. दोन्ही फलंदाजांचा काळ वेगळा आहे. त्यामुळे एक क्रिकेटप्रेमी म्हणून आपल्याला या दोघांचाही खेळ पाहण्याची संधी मिळाली, यातच खरे सुख मानले पाहिजे.’’
वेस्ट इंडिजच्या कसोटी क्रिकेटमधील सुमार प्रदर्शनाविषयी विचारले असता, ‘‘वेस्ट इंडिजचा संघ सध्या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. संघाची कामगिरी सुधारण्यासाठी मुळात जाऊन समस्यांवर तोडगा काढला पाहिजे. अन्यथा विंडीजला कसोटी संघाचा दर्जा गमवावा लागू शकतो,’’ असे लारा म्हणाला. याव्यतिरिक्त, पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची भारत आणि इंग्लंड या दोन देशांना संधी आहे, असे लाराने सांगितले.
कोहली सर्व विक्रम मोडेल -स्टीव्ह वॉ
नवी दिल्ली : विराट कोहली जेव्हा ऐन बहरात खेळत असतो, त्या वेळी त्याला रोखणे कोणत्याही गोलंदाजाला शक्य नाही. त्याने अनेक विक्रम यापूर्वीच मोडीत काढले असून भविष्यात तो फलंदाजीतील बहुतांश विक्रम मोडेल, असे ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने म्हटले आहे. केवळ सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी सरासरीतील ९९.९४ या विक्रमाशी बरोबरी साधणे त्याला शक्य नाही, असे त्यांनी नमूद केले. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून कोहलीची प्रशंसा होत असून त्यात वॉची भर पडली आहे. कोहलीने सगळ्यात कमी अवघ्या २०५ कसोटी सामन्यांमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठत नवीन विक्रमाची नोंद केली, त्या पाश्र्वभूमीवर वॉ यांनी ही प्रशंसा केली आहे.