नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महासंघाच्या आगामी निवडणुकीसाठी आपला गट (पॅनल) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटातील उमेदवार निश्चित करण्यासाठी ब्रिजभूषण यांनी ३० जुलै रोजी (रविवार) बैठक बोलावली आहे.ब्रिजभूषण आणि त्यांचा मुलगा करण यांना आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क देण्यात आलेला नाही. मात्र, त्यांचा जावई विशाल सिंह या निवडणुकीत बिहारचे प्रतिनिधित्व करणार असून तो अध्यक्षपदासाठी दावेदारी करण्याची शक्यता आहे. आपला गट निश्चित करण्यासाठी ब्रिजभूषण यांनी बैठक बोलावल्याची माहिती महासंघाचे मावळते सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘होय, ब्रिजभूषण यांनी रविवारी बैठक बोलावली आहे. बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ब्रिजभूषण यांना समर्थन करणारे राज्य कुस्ती संघटनांमधील अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विविध राज्य संघटनांचे अध्यक्ष आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहतील. त्यांच्याशी चर्चा करून कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी ब्रिजभूषण गटाचे उमेदवार ठरवले जातील,’’ असे तोमर यांनी सांगितले.

१२ ऑगस्ट रोजी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक होणार असून याकरिता अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ब्रिजभूषण यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे क्रीडा आचारसंहितेनुसार, त्यांना कोणत्याही पदासाठी अर्ज करता येणार नाही.