उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधूने स्विस खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मुंबईकर आनंद पवारला मात्र पराभवाचा धक्का बसला. अखिल इंग्लंड स्पर्धेत सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या लि मिचेलवर १९-२१, २१-१६, २१-११ अशी मात केली. पुढच्या सामन्यात सिंधूचा मुकाबला जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानावरील सिझियान वांगशी होणार आहे. तैपेईच्या सहाव्या मानांकित तिआन चेन चाऊने  पवारला १४-२१, २१-१२, २१-१२ असे नमवले.
क्रमवारीत सायनाची घसरण, सिंधू स्थिर
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालची जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. अखिल इंग्लंड स्पर्धेत सायनाला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. पी.व्ही.सिंधूने नववे स्थान कायम राखले आहे. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप १४व्या स्थिर आहे.