गतविजेत्या भारतास कनिष्ठ गटाच्या सुलतान जोहर चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत येथे इंग्लंडने २-० असा पराभवाचा धक्का दिला.
तमन दया स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत इंग्लंडचा पहिला गोल बेंजामिन जेम्स बुन याने २८ व्या मिनिटाला केला. त्यानंतर सामन्याच्या ५० व्या मिनिटाला त्याचा सहकारी सॅम्युअल फ्रेंच याने दुसरा गोल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली.
भारतीय खेळाडूंनी या लढतीत ब्रिटिश खेळाडूंना शेवटपर्यंत चिवट झुंज दिली मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आले. भारताचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले, आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला मात्र गोल करण्याच्या संधींचा लाभ उठविण्यात त्यांना यश मिळाले नाही. विशेषत: पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याबाबत पुन्हा आमचे खेळाडू कमी पडले.

Story img Loader