फुटबॉल सामन्यांच्या फिक्सिंग प्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी तपासाची दुसरी मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा सामना गमावण्यासाठी एका फुटबॉलपटूने पैसे घेतल्याच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर हा तपास महत्त्वपूर्ण मानला जात आहे. रुपर्ट मरडॉक यांच्या ‘सन ऑन संडे’ वृत्तपत्राने हाती घेतलेल्या स्टिंग ऑपरेशननुसार, ही माहिती समोर आली होती. या मोहिमेअंतर्गत हाती आलेले निष्कर्ष ‘सन ऑन संडे’ने ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हे संस्थेकडे सोपवले आहेत. ३०,००० पौंडांसाठी फुटबॉलचा सामना निश्चित करण्याची तयारी एका खेळाडूने दर्शवल्याची माहिती ‘सन ऑन संडे’चा वार्ताहर मझहर महमूदने दिली आहे. प्रीमिअर लीग स्पर्धेचे आणि पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे सामनेही निश्चित करू शकतो, असे या खेळाडूने वार्ताहराला सांगितले होते.

Story img Loader