British Prime Minister Rishi Sunak batting video viral : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे क्रिकेटवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. संपूर्ण जगाने शुक्रवारी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा सामना करताना त्याचे वेडेपण पाहिले. खुद्द पंतप्रधानांनी त्याचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन नेट प्रॅक्टिसशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते इंग्लंडच्या खेळाडूबरोबर खेळताना आणि मजा करताना दिसत होते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शेअर केला व्हिडीओ –

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आणि आपल्या कामगिरीबद्दल चाहत्यांना प्रश्न विचारले. त्याने लिहिले, “मी इंग्लंड संघात स्थान मिळवण्यासाठी तयार आहे का?” याला उत्तर देताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने उत्तर दिले की, “वाईट नाही, पण कदाचित तुम्हाला आधी आणखी काही नेट सेशनमध्ये भाग घ्यावा लागेल.”

या नेट सेशनमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पंतप्रधान ऋषी सुनक यांना गोलंदाजी केली. अलीकडेच जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ७०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला. याआधी श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने ८०० विकेट्स घेतल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ७०८ विकेट्स घेतल्या होत्या. अँडरसन हा सध्याच्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांपैकी एकमेव सक्रिय गोलंदाज आहे.

हेही वाचा – IPL 2024 : आज आरसीबीसमोर राजस्थानच्या विजय रथाला रोखण्याचे आव्हान, आतापर्यंत कोणाचे राहिले वर्चस्व? जाणून घ्या

तळागाळातील क्रिकेट विकसित करण्यासाठी मोठी घोषणा –

ऋषी सुनक यांनी अलीकडेच इंग्लंडमध्ये तळागाळातील क्रिकेट विकसित करण्यासाठी ३५ दशलक्ष पौंडची गुंतवणुकीची घोषणा केली होती. ‘मला क्रिकेट आवडते’, असे ते म्हणाले होते. त्यामुळे मला आनंद आहे की आम्ही आणखी तरुणांना खेळात सहभागी होण्यासाठी मदत करू शकतो. नऊ लाखहून अधिक तरुणांना क्रिकेट खेळण्यास मदत करण्यासाठी आम्ही तळागाळातील क्रिकेटमध्ये ३५ दशलक्ष पौंडची गुंतवणूक करत आहोत.