इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ओव्हलच्या पाचव्या कसोटी सामन्यात विशेष सुरक्षा मुखवटय़ाशिवाय खेळण्याची शक्यता आहे. मँचेस्टरच्या चौथ्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनचा चेंडू हॅल्मेटमधून मार्ग काढत नाकाला लागल्यामुळे ब्रॉडला मैदान सोडावे लागले होते. परंतु ब्रॉडच्या नाकाची जखम वेगाने बरी होत असल्यामुळे त्याला पुढील कसोटीत मुखवटय़ाची गरज भासणार नसल्याची माहिती मिळत आहे.

Story img Loader