इंग्लंडच्या क्रिकेट संघात समावेश असणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडविणारा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले आहे.
इंग्लंड संघाने प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेत ३-० च्या आघाडीने ऑस्ट्रेलियावर मात केली. या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजीची धुरा ब्रॉडने लिलया सांभाळली. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करत इंग्लंडला मजबूत स्थिती प्राप्त करुन देण्यात ब्रॉडचा महत्वाचा वाटा होता. चौथ्या कसोटी सामन्यात तर ब्रॉडने केवळ ५० धावा देत कांगारूंच्या सहा फलंदाजांना बाद केले होते. मालिकेतील या सर्व यशाचे श्रेय स्टु्अर्ट ब्रॉडने संपुर्ण संघाला दिले आहे. तसेच मी संघाचा भाग आहे याचा मला अभिमान वाटत असल्याचे तो म्हणाला.
इंग्लंड संघात माझा समावेश असणे अभिमानास्पद- स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडच्या क्रिकेट संघात समावेश असणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडविणारा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले आहे.
First published on: 20-08-2013 at 03:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Broad proud of unpleasant england