अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूनी फ्रेंच खुल्या स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. ब्रायन जोडीचे पुरुष दुहेरीचे हे विक्रमी १४वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. ब्रायन जोडीने फ्रान्सच्या मायकेल लोइड्रा आणि निकोलस माहुत जोडीचा ६-४, ४-६, ७-६ (४) असा पराभव केला. टायब्रेकरमध्ये पिछाडीवर पडलेल्या ब्रायन जोडीने शानदार पुनरागमन करत तिसऱ्या सेटसह जेतेपदावर कब्जा केला. या जोडीने याआधी २००३ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. लोइड्रा आणि माहुत या स्थानिक जोडीला प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा होता, मात्र ब्रायन जोडीने आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करत विजयाची नोंद केली.

Story img Loader