Bumrah broke Shami’s record by taking five wickets : केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार गोलंदाजी करत एकूण सहा विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी करत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या पराक्रमाच्या जोरावर बुमराहने अनेक विक्रमाची रांग लावली. त्याचबरोबर जवागल श्रीनाथ यांच्या एका मोठा विक्रमाशी बरोबरी केली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने एकूण आठ खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या सामन्यात बुमराहने १३.५ षटकात ६१ धावा देत सहा विकेट्स, घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ही तिसरी वेळ होती जेव्हा बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर आणि मोहम्मद शमी, श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसाद यांचा विक्रम मोडला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा डाव १७६ धावांवर आटोपला.
बुमराहने शमी, श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसादचा विक्रम मोडला –
जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. पाच विकेट्स घेताच त्याने जवागल श्रीनाथची बरोबरी केली. श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये तीनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.
बुमराहने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसाद यांना मागे टाकत दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या तिन्ही फलंदाजांनी त्यांच्या भूमीवर प्रोटीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. आता, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेणार्या भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराह श्रीनाथसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताकडून दक्षिण आफ्रिकेत एका डावात सर्वाधिक ५ विकेट्स घेणारे गोलंदाज (कसोटीमध्ये) –
३ -जसप्रीत बुमराह
३ – जवागल श्रीनाथ
२- मोहम्मद शमी
२ – एस श्रीसंत
२ – व्यंकटेश प्रसाद
न्यूलँड्स येथे कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
२५ – कॉलिन ब्लिथ (इंग्लंड)
१८ – जसप्रीत बुमराह (भारत)
१७ – शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
१६ – जेम्स अँडरसन (इंग्लंड)
१५ – जॉनी ब्रिग्ज (इंग्लंड)
दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेमटध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
४५ – अनिल कुंबळे
४३ – जवागल श्रीनाथ
३८* – जसप्रीत बुमराह
३५ – मोहम्मद शमी
३० – झहीर खान