दुबईच्या ओपन सुपर सिरीजमध्ये भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफायचा पराभव केला. २१-१५, २१-१८ अशा सेटमध्ये पराभव करत पी.व्ही सिंधूने फायनलमध्ये धडक मारली आहे.

याआधी सुपर सीरिज मालिकेतील अंतिम टप्पा जिंकण्याच्या निर्धाराने उतरलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने दुबई बॅडिमटन सुपर सीरिजमधील अपराजित्व आजही कायम राखले. तिने जपानच्या अकेनी यामागुचीवर २१-९, २१-१३ असा सहज विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. आता तिने फायनलमध्ये म्हणजेच अंतिम फेरीत धडक मारील आहे. यामागुचीविरुद्ध दोन्ही गेम्समध्ये तिने सुरुवातीपासून चतुरस्र खेळ करीत वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये प्रारंभापासूनच तिने उंचीचा फायदा घेत खोलवर परतीचे फटके मारले. तसेच तिने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. तिने मिळवलेली आघाडी तोडण्यात यामागुचीला यश मिळाले नाही.

शनिवारी सिंधूने चीनच्या चेन युफानचाही पराभव केला. दुबईच्या शेख हमदान इंडोर स्टेडियममध्ये एक तास हा सामना रंगला होता. चेन युफायचा २१-१५ आणि २१-१८ अशा सरळ सेटमध्ये करत सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू आणि युफाय चेन यांच्यात आत्तापर्यंत सहा वेळा सामने झाले आहेत. ज्यात सिंधू चारदा तर चेनने दोनदा बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतही सिंधूने चेनला पराभवाची धूळ चारली होती. आता उद्या अर्थात रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये सिंधूचा मुकाबला जपानच्या अकेनी यामागुचीसोबत होणार आहे. अकेनी यामागुची थायलंडच्या रत्चानोक इंतानोनचा पराभव करून फायनलमध्ये पोहचली आहे. मात्र सिंधूने तिचाच पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात काय होणार याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

Story img Loader