भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) घटना दुरुस्ती ठरावास मंजुरी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महासंघावरील बंदी लवकरच रद्द केली जाईल, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संघटकांना आयओएच्या कोणत्याही पदाची निवडणूक लढविण्यास मनाई करावी अन्यथा बंदी कायम ठेवली जाईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) आयओएला दिला होता. तसेच त्या संदर्भातील घटना दुरुस्ती १० डिसेंबरपूर्वी करण्याचेही बंधन त्यांनी घातले होते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे सर्व दबावास झुकून आयओएने घटना दुरुस्ती केली तसेच नव्याने निवडणुका घेण्याचाही निर्णय घेतला.
जितेंद्रसिंग यांनी सांगितले, ‘‘घटना दुरुस्तीमुळे आयओएचा कारभार अधिक पारदर्शी होईल व अन्य क्रीडा संघटनाही त्याचे अनुकरण करतील. नव्याने निवडणुका घेण्याचाही निर्णय स्वागतार्ह आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा