स्कॉटलंडचा अष्टपैलू कॅलम मॅक्लिओडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कॅलम मॅक्लिओड शेवटचा सामना टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये खेळला होता. २१ ऑक्टोबर रोजी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. ३३ वर्षीय कॅलम मॅक्लिओडने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

कॅलम मॅक्लिओडने झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 25 धावा केल्या, ज्यामध्ये स्कॉटलंडचा पाच विकेट्सनी पराभव झाला आणि स्कॉटलंडचा संघ टी-२० विश्वचषक सुपर-१२ साठी पात्र ठरू शकला नाही.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

कॅलम मॅक्लिओडची कामगिरी –

मॅक्लिओड हा स्कॉटलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने संघासाठी पाच विश्वचषक खेळले आहेत. कॅलम मॅक्लिओडने इंग्लंडविरुद्ध १४० धावा केल्या, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले जाते. २०१८ मध्ये, कॅलम मॅक्लिओडच्या या खेळीमुळे स्कॉटलंडने इंग्लंडविरुद्धचा एकदिवसीय सामना सहा धावांनी जिंकला. त्याने २०१४ मध्ये कॅनडाविरुद्ध १७५ धावा केल्या होत्या, ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

हेही वाचा – ENG vs SL T20 World Cup 2022: नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कॅलम मॅक्लिओडची क्रिकेट कारकीर्द –

कॅलम मॅक्लिओडने स्कॉटलंडकडून ८८ एकदिवसीय आणि ६४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेक. त्याच्या नावावर ८८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतके आणि १३ अर्धशतकांसह ३०२६ धावा आहेत. त्याचबरोबर ६४ टी-20 सामन्यांमध्ये सात अर्धशतकांसह १२३८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २८ प्रथम श्रेणी, १६१ लिस्ट ए आणि १३७ टी-२० सामने खेळले आहेत.