Lucknow Super Giants Coach: आयपीएल २०२३च्या मोसमात लखनऊ सुपर जायंट्स संघाची कामगिरी चांगली होती. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला तरी गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल. राहुल दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. मात्र, आता लखनऊ सुपर जायंट्सशी संबंधित मोठी बातमी येत आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टिन लँगर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नवा प्रशिक्षक होऊ शकतो. सध्या या संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आहेत. तर गौतम गंभीर संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे आणि त्यातही कदाचित बदल होऊ शकतो.

जस्टिन लँगरची कारकीर्द कशी होती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जस्टिन लँगर लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नवे प्रशिक्षक असतील. जस्टिन लँगरच्या कारकिर्दीवर जर एक नजर टाकली तर या खेळाडूने ऑस्ट्रेलियाकडून १०५ कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय या खेळाडूने ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये कांगारूंचे प्रतिनिधित्व केले. तसेच जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. या १०८ कसोटी सामन्यांमध्ये जस्टिन लँगरने ७६९६ धावा केल्या. जस्टिन लँगरने कसोटी सामन्यात २३ शतके झळकावली आहेत. याशिवाय जस्टिन लँगरने पन्नास धावांचा आकडा ३० वेळा पार केला. जस्टिन लँगरच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये ३ द्विशतके आहेत.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

हेही वाचा: World Cup 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! वर्ल्डकप २०२३च्या सामन्यांच्या तिकिटांचे दर झाले जाहीर, जाणून घ्या

आयपीएल २०२३च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने अशीच कामगिरी केली

मात्र, आयपीएल २०२३ हंगामातील लखनऊ सुपर जायंट्सच्या कामगिरीबद्दल जर बोलायचे झाले तर, हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. आयपीएल २०२३च्या हंगामात, लखनऊ सुपर जायंट्सने १५ सामने खेळले. लखनऊ सुपर जायंट्सने या १५ सामन्यांमध्ये ८ विजय मिळवले आणि ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या मोसमात संघाचा नियमित कर्णधार के.एल. राहुल दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. के.एल. राहुलच्या अनुपस्थितीत अष्टपैलू क्रुणाल पांड्याने लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधाराची भूमिका बजावली.

हेही वाचा: INDW vs BANW: दीप्ती-शफालीची जबरदस्त गोलंदाजी! भारताचा बांगलादेशवर आठ धावांनी रोमहर्षक विजय, मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात लाइव्ह सामन्यात जबरदस्त भांडण झालं होतं. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने या दोघांकडून १०० टक्के मॅच फी दंड म्हणून वसूल केली होती. त्यानंतरही माजी खेळाडू गंभीर या वादावर कमेंट करून चर्चेत होता. आता त्याची पुन्हा चर्चा रंगलीय आणि यावेळी त्याच्यासोबत लखनऊचा प्रवास संपवणार अशी माहिती समोर येतेय. त्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती संघाच्या वरिष्ठांनी दिलेली नाही.

Story img Loader