आंतराष्ट्रीय क्रिकेट मधला भारताचा सध्याचा सर्वात गतीमान गोलंदाज उमेश यादवच्या म्हणण्यानुसार, गोलंदाजीतल्या उत्तम गतीमानतेमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे गोलंदाजीची गती कमी करण्याबाबतीत किंवा गोलंदाजीच्या गतीशी निगडीत इतर कशासाठीही तडजोड करणे योग्य नाही.
उमेश यादव म्हणाला, गतीमान गोलंदाजाच्या भूमिकेतून खेळत असताना मला माझ्या उद्देशात स्पष्टता राखणे महत्वाचे आहे. गतीमान गोलंदाजी करणे ही माझी बळकट बाजू आहे आणि तेच माझे कायम लक्ष्य असणेही महत्वाचे आहे. त्यामुळे गोलंदाजीच्या गतीत कोणतीही तडजोड मी कधीच करणार नाही. त्याचबरोबर एकदिवसीय, कसोटी, टी-२० या सर्व प्रकारच्या सामन्यांत भारतीय संघात माझा समावेश होतो तो, केवळ माझ्या गोलंदाजीच्या गतीमानतेमुळे त्यामुळे गोलंदाजीत गतीमानता ही माझी प्राथमिकता आहे. असेही उमेश यादव म्हणाला.
इतर कशासाठीही गोलंदाजीत तडजोड करणार नाही- उमेश यादव
आंतराष्ट्रीय क्रिकेट मधला भारताचा सध्याचा सर्वात गतीमान गोलंदाज उमेश यादवच्या म्हणण्यानुसार, गोलंदाजीतल्या उत्तम गतीमानतेमुळे त्याला भारतीय
First published on: 23-08-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can never compromise on pace for anything else umesh yadav