आंतराष्ट्रीय क्रिकेट मधला भारताचा सध्याचा सर्वात गतीमान गोलंदाज उमेश यादवच्या म्हणण्यानुसार, गोलंदाजीतल्या उत्तम गतीमानतेमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे गोलंदाजीची गती कमी करण्याबाबतीत किंवा गोलंदाजीच्या गतीशी निगडीत इतर कशासाठीही तडजोड करणे योग्य नाही.
उमेश यादव म्हणाला, गतीमान गोलंदाजाच्या भूमिकेतून खेळत असताना मला माझ्या उद्देशात स्पष्टता राखणे महत्वाचे आहे. गतीमान गोलंदाजी करणे ही माझी बळकट बाजू आहे आणि तेच माझे कायम लक्ष्य असणेही महत्वाचे आहे. त्यामुळे गोलंदाजीच्या गतीत कोणतीही तडजोड मी कधीच करणार नाही. त्याचबरोबर एकदिवसीय, कसोटी, टी-२० या सर्व प्रकारच्या सामन्यांत भारतीय संघात माझा समावेश होतो तो, केवळ माझ्या गोलंदाजीच्या गतीमानतेमुळे त्यामुळे गोलंदाजीत गतीमानता ही माझी प्राथमिकता आहे. असेही उमेश यादव म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा