तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यवरही मालिका गमावण्याची नामुष्की ओढवलेला भारतीय ‘अ’ संघाबरोबरच कर्णधार युवराज सिंगला वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धचा शनिवारी होणारा ट्वेन्टी-२० सामना जिंकून गतवैभव मिळवण्याची संधी असेल. त्याचबरोबर साऱ्यांच्या नजराही यावेळी युवराजवर असून तो या सामन्यात काय कमाल करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एकदिवसीय मालिकेत युवराज आणि युसूफ पठाण यांना चांगल्या धावा करता आल्या होत्या. बाबा अपराजीतने तिसऱ्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. पण अन्य फलंदाजांना मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. गोलंदाजीमध्ये जयदेव उनाडकट, शाहबाद नदीन आणि राहुल शर्मा यांच्याकडून संघाला जास्त अपेक्षा असतील.
वेस्ट इंडिजच्या संघातील किर्क एडवर्ड्स आणि जोनाथन कार्टर हे फलंदाज भन्नाट फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीची धुरा आंद्रे रसेलवर असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ‘अ’ : युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, नमन ओझा (यष्टीरक्षक), बाबा अपराजित, केदार जाधव, युसूफ पठाण, विनय कुमार, शाहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, जयदेव उनाडकट, उन्मुक्त चंद, राहुल शर्मा आणि सुमित नरवाल.
वेस्ट इंडिज ‘अ’ : किरॉन पॉवेल (कर्णधार), आंद्रे फ्लेचर, किर्क एडवर्ड्स, लीऑन जॉन्सन, जोमाथन कार्टर, आंद्रे रसेल, डेव्हॉन थॉमस (यष्टीरक्षक), अ‍ॅश्ले नर्स, निकिता मिलर, वीरस्वॉमी पेरमॉल, मिग्युएल कमिन्स, नरसिंग देवनारायण, शेल्डॉन कोटेरेल, क्रुमा बॉनेर आणि रॉन्सफोर्ड बीटॉन.

Story img Loader