पीटीआय, नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाला गुरुवारी मोठा धक्का बसला. निवडणुका दिलेल्या वेळेत घेण्यात अपयश आल्याने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेकडून (यूडब्ल्यूडब्ल्यू) घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे कुस्तीगिरांना आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ध्वजाखाली खेळता येणार नाही.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा आहे. या स्पर्धेत भारतीय कुस्तीगिरांना ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या ध्वजाखाली खेळावे लागणार आहे. ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने भूपेंदर सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील हंगामी समितीला भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र, या कालावधीत निवडणुका घेण्यात अपयश आल्याने ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने भारतीय महासंघावर कठोर कारवाई केली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) २७ एप्रिल रोजी हंगामी समितीची नियुक्ती केली होती. या समितीने ४५ दिवसांत निवडणूक घेणे अपेक्षित होते. दिलेल्या वेळेत निवडणुका न घेतल्यास निलंबनाची कारवाई करण्याची ताकीद ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने २८ एप्रिल रोजी दिली होती. मात्र, त्यानंतरही विविध कारणांनी निवडणुका लांबणीवर पडल्या.

mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
What Omar Abdullah Said?
India Alliance “..तर इंडिया आघाडी बंद करा”; ओमर अब्दुल्लांंचं वक्तव्य, आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत?
Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?

‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने बुधवारी रात्री भारतीय कुस्ती महासंघाला आपला निर्णय कळवला, असे ‘आयओए’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, भूपेंदर बाजबा यांनी कुस्ती महासंघातील घडामोडींबाबत आम्हाला कोणतीही माहिती न दिल्याचा आरोप हंगामी समितीचे सदस्य ग्यान सिंह यांनी केला आहे. तसेच महासंघाबाबचे कोणतेही निर्णय घेताना आमचे मत विचारात घेतले जात नाही असा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या काही काळापासून भारतीय कुस्ती महासंघ विविध कारणांनी चर्चेत आहे. महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करताना देशातील आघाडीच्या कुस्तीगिरांना आंदोलन पुकारले होते. याच्या पार्श्वभूमीवर, या मल्लांना एकाही स्पर्धेत खेळता आले नाही. शिवाय भारतात एकही स्पर्धा झाली नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय ध्वजाखाली खेळणार

भारतीय कुस्तीगिरांना २३ सप्टेंबरपासून चीनच्या हांगझो येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ध्वजाखाली खेळता येणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून नाही, तर ‘आयओए’कडून खेळाडूंची नावे पाठवली जातात. परंतु जागतिक स्पर्धेसाठी संघ भारतीय कुस्ती महासंघाकडून पाठवला जातो. त्यामुळे जागतिक स्पर्धेत मात्र मल्लांना भारतीय ध्वजाखाली खेळण्यास बंदी असेल.

निवडणुका वारंवार लांबणीवर

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक सुरुवातीला ७ मे रोजी होणार होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाकडून पूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि ‘आयओए’कडून कुस्ती महासंघाचा कारभार चालवण्यासाठी हंगामी समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध राज्य संघटनांनी निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकांसाठी ११ जुलैची तारीख जाहीर केली. मात्र, मतदान अधिकार नसल्याने आसाम संघटनेने गुवाहाटी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्यांना २५ जून रोजी निवडणुकांवर स्थगिती मिळवण्यात यश आले. या प्रकरणात पुढची सुनावणी २८ जुलै रोजी होणार होती.

परंतु आंध्र राज्य संघटनेने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि १८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी १२ ऑगस्टला निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. परंतु, निवडणुका होण्याच्या एक दिवस आधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा कुस्ती महासंघाच्या याचिकेवर सुनावणी करताना पुढील आदेशापर्यंत निवडणुका स्थगित केल्या होत्या. हरियाणा हौशी कुस्ती संघटनेला मतदानाचा हक्क दिल्याच्या विरोधात ही याचिक दाखल करण्यात आली होती. यावर आता शुक्रवारी सुनावणी होणे अपेक्षित आहे.

निवड चाचणी ठरल्याप्रमाणेच!

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीची निवड चाचणी ठरल्याप्रमाणे म्हणजेच २५ आणि २६ ऑगस्टलाच होणार असल्याचे हंगामी समितीचे अध्यक्ष भूपेंदर सिंग बाजवा यांनी स्पष्ट केले. ही स्पर्धा पटियाळा येथे होणार असून या स्पर्धेत ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध आंदोलन केलेले सहाही मल्ल सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

Story img Loader