वृत्तसंस्था, टोरंटो
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विश्रांतीच्या दिवसानंतर दमदार पुनरागमन करताना डी. गुकेशने आठव्या फेरीत भारताच्याच विदित गुजराथीवर मात करत ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा संयुक्तरीत्या आघाडी मिळवली. इयान नेपोम्नियाशीला अझरबैजानच्या निजात अबासोवला नमवण्यात अपयश आले. त्यामुळे आता गुकेश आणि नेपोम्नियाशी यांचे समान पाच गुण आहेत. खुल्या विभागातील अन्य भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलिरेझा फिरुझाविरुद्ध बरोबरी नोंदवली.
१७ वर्षीय गुकेशला सातव्या फेरीत फिरुझाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आठव्या फेरीत त्याने अधिक लक्षपूर्वक खेळ करताना नाशिककर विदितला ३८ चालींत पराभूत केले. विशेष म्हणजे, गुकेशने हा विजय काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना मिळवला. यापूर्वी गुकेश आणि विदित पहिल्या फेरीतही आमनेसामने आले होते. ती लढत बरोबरीत सुटली होती. आठव्या फेरीतील लढतीत मात्र विदितला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही.
गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’मधील विजेत्या नेपोम्नियाशीला यंदाच्या स्पर्धेत सर्वात खालचे मानांकन असलेल्या अबासोवने बरोबरीत रोखले. अबासोवने पहिल्या फेरीतही नेपोम्नियाशीविरुद्ध बरोबरीची नोंद केली होती. दुसरीकडे, अमेरिकेच्या दोन अनुभवी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या आठव्या फेरीच्या लढतीत हिकारू नाकामुराने अग्रमानांकित फॅबियानो कारुआनावर विजय मिळवला. प्रज्ञानंदला पांढऱ्या मोहऱ्यांचा फायदा करून घेता आला नाही आणि त्याला फिरुझाविरुद्ध अध्र्या गुणावर समाधान मानावे लागले.
आठ फेऱ्यांअंती, गुकेश आणि नेपोम्नियाशी प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहेत. प्रज्ञानंद आणि नाकामुरा त्यांच्यापेक्षा केवळ अध्र्या गुणाने मागे आहेत. कारुआना चार गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यांच्या खालोखाल विदित (३.५ गुण) सहाव्या, फिरुझा (३) सातव्या आणि अबासोव (२.५) आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा >>>MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
महिला विभागात, दोन भारतीय ग्रँडमास्टरमध्ये झालेल्या लढतीत अनुभवी कोनेरू हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आर. वैशालीवर ६३ चालींत मात केली. हम्पीचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. त्यामुळे चार गुणांसह ती थेट संयुक्त पाचव्या स्थानी आली आहे. वैशाली २.५ गुणांसह तळाला आहे. सात फेऱ्यांमध्ये अग्रस्थान टिकवून ठेवलेल्या टॅन झोंगीला आठव्या फेरीत चीनच्याच ले टिंगजीकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे आता झोंगी, टिंगजी आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानावर आहेत. सहा फेऱ्या शिल्लक असताना महिला विभागातील चुरस आता वाढली आहे.
खुल्या विभागात, गुकेशने विदितविरुद्ध अप्रतिम खेळ केला. त्याने सुरुवातीलाच विदितला थोडे गोंधळात टाकले. त्यामुळे पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या विदितने पाचवी चाल रचण्यापूर्वी जवळपास २० मिनिटे घेतली. त्यानंतर विदितने पटाच्या दोन्ही बाजूंनी गुकेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावाच्या मध्यात गुकेशने आपल्या वजीर आणि हत्तीचा खुबीने वापर करताना लढतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. यानंतर विदितने पुन्हा चांगल्या स्थितीत येण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडे चाली रचण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नव्हता. गुकेशने पूर्ण वर्चस्व मिळवताना आठव्या घरात प्रवेश केला आणि विदितने ३८ चालींअंती हार मान्य केली.
हेही वाचा >>>IPL 2024: रोहितची शतकी खेळी व्यर्थ; पथिरानाच्या गोलंदाजीमुळे चेन्नईचा मुंबईवर दणदणीत विजय
आठव्या फेरीचे निकाल
’ खुला विभाग : आर. प्रज्ञानंद (एकूण ४.५ गुण) बरोबरी वि. अलिरेझा फिरुझा (३), विदित गुजराथी (३.५) पराभूत वि. डी. गुकेश (५), हिकारू नाकामुरा (४.५) विजयी वि. फॅबियानो कारुआना (४), इयान नेपोम्नियाशी (५) बरोबरी वि. निजात अबासोव (२.५).
’ महिला विभाग : टॅन झोंगी (एकूण ५ गुण) पराभूत वि. ले टिंगजी (५), कोनेरू हम्पी (३.५) विजयी वि. आर. वैशाली (२.५), नुरग्युल सलिमोवा (३.५) बरोबरी वि. अॅना मुझिचुक (३), कॅटेरिना लायनो (४.५) बरोबरी अलेक्झांड्रा गोर्याचकिना (५).
गुकेशने पुन्हा एकदा नेपोम्नियाशीला अग्रस्थानावर गाठले, पण दोघांच्याही खेळात खूप फरक जाणवला. गुकेशने विदितवर काळय़ा मोहऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवला, तर पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळतानाही नेपोम्नियाशीला शेवटच्या क्रमांकावरील अबासोववर मात करता आली नाही. त्यामुळे नेपोम्नियाशी स्वत:च्या खेळावर नाराज दिसला. या उलट अबासोवच्या खेळाची आणि त्याच्या खंबीर बचावाची सर्वानी स्तुती केली. दुसरीकडे, विश्रांतीच्या दिवसाचा फायदा घेत गुकेशने स्वत:ला सावरले. मायक्रोबायॉलॉजिस्ट आई पद्मा आणि नाक, कान, घसा तज्ज्ञ वडील रजनीकांत यांच्याशी बोलून आपल्याला फायदा झाला, असे गुकेश म्हणाला. महिलांमध्ये, वाईट सुरुवातीनंतर वैशालीला हम्पीने अनेक वेळा पुनरागमनाची संधी दिली होती, पण ती न घेता आल्यामुळे वैशालीला सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.- रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक