पीटीआय, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेतृत्वबदलानंतर चाहत्यांकडून बरीच टीका होत असली, तरी मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. मला त्यांच्या मतांचा आदर आहे. मात्र, मी केवळ माझ्या नियंत्रणात जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो. रोहित यापुढे मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला, तरी त्याचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे ठरेल. त्याचा वारसा पुढे चालवण्याचा माझा प्रयत्न असेल, असे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील संघ मुंबई इंडियन्सचा नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंडय़ा सोमवारी म्हणाला.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले आहे. मात्र, यंदाच्या हंगामापूर्वी मुंबईच्या व्यवस्थापनाने रोहितच्या जागी अष्टपैलू हार्दिकची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिककडे देण्याचा निर्णय मुंबईच्या चाहत्यांना फारसा आवडलेला नाही. मुंबई संघ आणि हार्दिकवर समाजमाध्यमांवर बरीच टीका केली जात आहे.
हेही वाचा >>>IPL 2024 : रोहित शर्माबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच, हार्दिक-बाऊचरने बाळगले मौन, VIDEO होतोय व्हायरल
‘‘मुंबई इंडियन्ससाठी रोहितचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. तो भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि याचा मला फायदाच होईल. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने ‘आयपीएल’मध्ये जे यश मिळवले, त्याने कर्णधार म्हणून जो वारसा सोडला आहे, तोच पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. रोहित आणि माझ्यातील संबंध पूर्वी होते तसेच आहेत. आम्ही दशकभरापासून एकत्रित खेळत आहोत. माझी जवळपास पूर्ण कारकीर्दच रोहितच्या नेतृत्वाखाली घडली आहे. त्यामुळे त्याचे मार्गदर्शन अजूनही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे,’’ असे हार्दिकने सांगितले.
यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाला २२ मार्चपासून सुरू होणार असून त्यापूर्वी सोमवारी मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी हार्दिक आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांना काही अवघड प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली.
हेही वाचा >>>IPL 2024 : रोहित शर्माचाच वारसा मी पुढे नेणार; हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना ग्वाही
नेतृत्वबदलानंतर चाहत्यांकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता हार्दिक म्हणाला, ‘‘मला चाहत्यांचा आणि त्यांच्या मतांचा खूप आदर आहे. मात्र, मी केवळ क्रिकेट खेळण्याकडे आणि यश मिळवण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष देतो. माझ्या नियंत्रणात जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला मला आवडते. मात्र, चाहत्यांचे महत्त्व मला ठाऊक आहे. त्यांचे प्रेम आणि पाठिंब्याशिवाय आम्ही इतक्या वरच्या स्तरावर पोहचू शकत नाही.’’
सर्व सामने खेळण्याचे लक्ष्य
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकातील सामन्यादरम्यान हार्दिकच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला जवळपास पाच महिने मैदानाबाहेर राहावे लागले. त्याने नुकत्याच एका स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आता तो ‘आयपीएल’मध्ये सर्व सामने खेळण्यासाठी उत्सुक आहे. ‘‘शारीरिकदृष्टय़ा मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि सर्व सामने खेळण्याचे माझे लक्ष्य आहे. ‘आयपीएल’मध्ये मी यापूर्वीही फारशा सामन्यांना मुकलेलो नाही. विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीचा पूर्वीच्या दुखापतींशी संबंध नाही,’’ असे हार्दिकने नमूद केले.