मैदानात खोऱ्याने धावा काढणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हा आपल्या फिटनेसबद्दल तितकाच काटेकोर आहे. जगातील सगळ्यात फिट खेळाडूमध्ये विराटचं नाव सर्वात पुढे असेल. जिममध्ये बराच वेळ घाम गाळण्याबरोबरच कोहली त्याच्या डाएटवरही योग्य प्रकारे काम करतो. विराट कोहली हा अस्सल खवय्यांपैकी एक आहे. पण फिटनेससाठी विराटने अंडी-चिकन बिर्याणी खाणं सोडलेय. विराट कोहलीने शुद्ध शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या फिटनेसकडे लक्ष देत विराट हेल्दी लाईफस्टाईलचे सगळे नियम पाळतोय.
मांसाहार सोडल्यामुळे माझ्या खेळमध्ये सुधारणा झाल्याचे विराट कोहलीने सांगितले आहे. सध्या प्रोटीन शेक, आणि पालेभाज्या हा त्याचा आहार आहे. त्यानं अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खाणंही सोडून दिलंय. शाकाहारामुळं पचनशक्ती वाढलीय. त्यामुळं पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त वाटतंय, असं कोहलीचं म्हणणं आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने चार महिन्यापासून एनिमल प्रोटीन घेणंही बंद केले आहे.