हॅरिसन : कर्णधार लिओनेल मेसीने केलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेटिनाने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात जमैकावर ३-० अशी मात केली. अर्जेटिनाचा संघ आता सलग ३५ सामने अपराजित आहे. या सामन्यात अर्जेटिनाने सुरुवातीपासून तुलनेने दुबळय़ा जमैकावर वर्चस्व गाजवले. १३व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने अर्जेटिनाचे गोलचे खाते उघडले. अर्जेटिनाने एका गोलची आघाडी मध्यंतराला कायम राखली. त्यानंतर ५६व्या मिनिटाला मेसीचे बदली खेळाडू म्हणून मैदानात प्रवेश केला. त्याने ८६ आणि ८९व्या मिनिटाला गोल करत अर्जेटिनाला हा सामना ३-० अशा फरकाने जिंकवून दिली.

Story img Loader