फिफा विश्वचषक २०२२ मध्ये कॅमेरूनच्या संघाने ब्राझीलचा १-० असा पराभव करून इतिहास रचला. फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलला पराभूत करणारा कॅमेरून हा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतरही कॅमेरूनला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. त्यामुळे हा संघ ग्रुप-जीमध्ये तिसरे स्थानावर राहिला. विजयानंतर अबुबकरने काही असा जल्लोष केला, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
शुक्रवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या या सामन्यात कॅमेरूनच्या विजयाचा हिरो कर्णधार व्हिन्सेंट अबुबाकर ठरला. त्याने सामना संपण्याच्या काही मिनिटे आधी (९२व्या मिनिटाला) आपल्या संघासाठी शानदार गोल केला. या गोलमुळे संघाचा विजय निश्चित झाला. हा ऐतिहासिक गोल केल्यानंतर व्हिन्सेंट अबुबाकरने जोरदार जल्लोष केला, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
अबुबकरने विजयाच्या जल्लोषाच्या भरात शर्ट काढून जमिनीवर फेकला. त्याचे हे कृत्य मॅच रेफरीला अजिबात आवडले नाही आणि त्यांनी कॅमेरूनच्या कर्णधाराला येलो कार्ड दाखवले. या सामन्यातील त्याचे हे दुसरे येलो कार्ड असल्याने रेफरीने त्याला रेड कार्डही दाखवले. परिणामी अबुबकरला मैदान सोडावे लागले.
ब्राझील आधीच उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्यामुळे, त्याने कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यात बेंच स्ट्रेंथ आजमावली, जे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण होते. ब्राझीलने २४ वर्षांनंतर ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना गमावला आहे. यापूर्वी १९९८ च्या विश्वचषकात त्यांना नॉर्वेविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता.
फिफा विश्वचषक २०२२ च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामनेही निश्चित झाले आहेत. प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या १६ संघांमध्ये फ्रान्स, ब्राझील, पोर्तुगाल, नेदरलँड, सेनेगल, यूएसए, इंग्लंड, अर्जेंटिना, पोलंड, स्वित्झर्लंड, क्रोएशिया, जपान, मोरोक्को, स्पेन, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.