जगभरात क्रिकेट हा खेळ चांगला लोकप्रिय आहे. क्रिकेटसोबतच बॉलिवूडचीही चर्चा जगभरात होत असते. क्रिकेट आणि बॉलिवूडचं तसं खास नातं आहे. आयपीएल तसेच अन्य क्रिकेट स्पर्धांमध्ये ते स्पष्टपणे दिसून येतं. दरम्यान, आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूला बॉलिवूडमधील ‘डिंपल गर्ल’ अर्थात प्रीति झिंटाची भुरळ पडली आहे. त्याने प्रीति झिंटासोबतचा एक खास फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. प्रीति झिंटा माझी सर्वात आवडती अभिनेत्री असल्याचे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा >> IND vs AFG Asia Cup 2022 : आज भारत-अफगाणिस्तान यांच्यात लढत, खेळ सुधारण्याची टीम इंडियाला संधी, जाणून घ्या Playing 11

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने सध्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये(सीपीएल) खेळतोय. तो सध्या जमायका तल्लावाह संघाचे प्रतिनिधित्व करतोय. बुधवारी जमायका तल्लावाह आणि सेंट लुसिया किंग्ज या दोन संघांमध्ये लढत झाली. यावेळी प्रीति झिंटाने मोहम्मद आमीरसोबत एक सेल्फी घेतला. तोच फोटो आमीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत त्याने ‘बॉलिवूडमधील माझी सर्वात आवडती अभिनेत्री’ असे कॅप्शनही दिले आहे.

हेही वाचा >> ‘भारताचे खेळाडूही आम्हाला मिठ्या मारतात, पण अफगाणिस्तानचे मात्र…’ शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी

सेंट लुसिया संघाची सहमालकीण आहे प्रीति

इंडियन प्रिमियर लीगमध्ये प्रीति झिंटा पंजाब किंग्ज संघाची मालकीण आहे. अगदी तशाच पद्धतीने ती कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये प्रीति सेंट लुसिया किंग्ज संघाची सहमालकीण आहे. याच कारणामुळे प्रीति जमायका तल्लावाह विरुद्ध सेंट लुसिया हा सामना पाहण्यासाठी डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गेली होती. या सामन्यात प्रीति झिंटाच्या सेंट लुसिया किंग्ज संघाचा विजय झाला.

Story img Loader