Virat Kohli, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने ४ विकेट्स गमावून २८८ धावा केल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. यानंतर शुबमन गिल आणि अचिंक्य रहाणे यांनी लगेचच विकेट गमावल्या. आता सर्व जबाबदारी पुन्हा एकदा विराट कोहलीच्या खांद्यावर आली आहे. विराटने इथून रवींद्र जडेजासोबत टीम इंडियाचा डाव सांभाळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहली सध्या ८७ धावांवर खेळत असून या सामन्यात तो ७६व्या शतकाच्या अगदी जवळ आहे. विराट कोहलीसाठीही हा सामना खूप खास आहे. वेस्ट इंडिजच्या यष्टिरक्षकालाही विराटने आपले शतक पूर्ण करावे असे वाटते. खरं तर, वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक जोशुआ दा सिल्वा म्हणाला, “माझ्या आईने मला सांगितले की ती फक्त विराट कोहलीला पाहण्यासाठी आली आहे. यावर माझा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. विराट तू शतक पूर्ण कर. त्यामुळे तुम्ही तुमचे पूर्ण करावे अशी माझी आणि माझ्या आईची इच्छा आहे.” जोशुआ दा सिल्वाची ही संपूर्ण गोष्ट स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

जोशुआ दा सिल्वा आणि त्याची आई विराट कोहलीची मोठे चाहते आहेत आणि याचा खुलासा खुद्द जोशुआने केला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान स्टंपच्या मागे उभे असलेले जोशुआ दा सिल्वा आणि विराट कोहली यांच्यातील मजेशीर संभाषण स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले आहे आणि आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जोशुआ विराट कोहलीचा फॅनबॉय होईल असे कोणालाच वाटले नव्हते. वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या मॅचमध्ये खूप कमी प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी मैदानावर येत आहेत. अशा परिस्थितीत खेळाडू मैदानावर काय बोलतात हे स्टंप माईकवर ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा: World Cup 2023: भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी चाहत्यांचा देसी जुगाड, हॉटेल दर परवडत नाही म्हणून केले ‘या’ ठिकाणी बुकिंग

विराट कोहलीसाठी हा सामना खूप खास आहे

विराट कोहली हा केवळ टीम इंडियाचाच नाही तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. त्याचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. विराट कोहलीपूर्वी केवळ तीन खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. याबरोबरच विराट कोहली ५०० सामने खेळणारा जगातील १०वा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावताच, ५००व्या सामन्यात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. विराटला आता या सामन्यात शतक झळकावण्याची संधी आहे. विराट आपल्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावेल अशी आशा चाहत्यांना आहे. याशिवाय या सामन्यात विराटने शतक करावे, अशी विरोधी संघातील खेळाडूची इच्छा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caribbean wicketkeeper turned out to be a big fan of virat kohli conversation with joshua de silva went viral avw