माद्रिद : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर अव्वल मानांकित कार्लोस अल्कराझ डेव्हिस चषक लढत खेळण्यासाठी स्पेनमध्ये दाखल झाला आहे. मात्र, त्याच्या सहभागाविषयी अजून संदिग्धताच बाळगली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानासह मायदेशात पाऊल ठेवताना मला अभिमान वाटत आहे. डेव्हिस चषक लढतीत खेळणे माझ्यासाठी नेहमीच विशेष असते. हे वातावरण वेगळेच असते आणि मी स्पेनसाठी खेळण्यास उत्सुक आहे,’’ असे अल्काराझ म्हणाला.
‘‘डेव्हिस चषक लढतीत बुधवारी स्पेनची गाठ बलाढय़ सर्बियाशी पडणार आहे. अल्काराझ बुधवारी खेळू शकेल की नाही, याबाबत मला अजून कल्पना नाही. अल्कराझशी याबाबत संवाद साधल्यानंतरच त्याच्या खेळण्याविषयी निर्णय घेऊ. तो खेळू शकल्यास आमच्यासाठी चांगलेच असेल,’’ असे स्पेनचे कर्णधार सर्गी ब्रुगेएरा म्हणाले.
अल्कराझ क्रमवारीत अग्रस्थानी
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर स्पेनचा १९ वर्षीय कार्लोस अल्कराझ पुरुषांच्या टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचला आहे. अल्कराझने चौथ्या स्थानावरून अग्रस्थानी झेप घेतली. नॉर्वेच्या रूडने हंगामातील ग्रँडस्लॅम स्पर्धाचा दुसरा अंतिम सामना खेळताना सातव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी मजल मारली. नदालला अग्रस्थानी पोहोचण्याची संधी होती, मात्र चौथ्या फेरीत फ्रान्सिस टिआफोकडून पराभूत झाल्याने तो तिसऱ्या स्थानी राहिला. डॅनिल मेदवेदेवची चौथ्या स्थानी घसरण झाली असून दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी न झालेला अॅलेक्झांडर झ्वेरेव्हही दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे. हंगामातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला मुकणारा नोव्हाक जोकोव्हिच एका स्थानाच्या घसरणीसह सातव्या स्थानी आहे. इगा श्वीऑनटेकने महिलांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे, तर ओन्स जाबेऊर दुसऱ्या स्थानी आहे.
आव्हानात्मक सामन्यांतील खेळ अविश्वसनीय!
इतके आव्हानात्मक आणि प्रदीर्घ चालणारे सामने कसे खेळलो, याची मला कल्पना नाही, असे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेता कार्लोस अल्कराझ म्हणाला. अल्कराझने पाच तास, १५ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात यानिक सिन्नेरला नमवले. त्यानंतर चार तास, १९ मिनिटांत झालेल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सिस टिआफोला पराभूत केले. ‘‘तुम्ही चांगले आहात, हे प्रतिस्पर्धी खेळाडूंना दाखवावे लागते. तुम्हाला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागेल, मात्र आपल्याला त्यावर मात करून पुढे जावे लागते. यानिकविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चालणेही कठीण जात होते. पण तुमच्यात जे काही आहे, ते तुम्हाला द्यावे लागते. आपली रोजची मेहनत ही त्यासाठीच असते,’’ असे अल्कराझने सांगितले. जेतेपद मिळवल्यानंतर अल्कराझची तुलना ही इतर दिग्गज टेनिसपटूंसोबत होऊ लागली आहे, मात्र ही तुलना करण्याची वेळ नसल्याचे अल्कराझला वाटते, तो म्हणाला, ‘‘प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. पण मला कधीही रॉजर फेडरर किंवा राफेल नदाल यांसारख्या इतर कोणत्याही खेळाडूसारखे वाटायचे नव्हते. माझी खेळण्याची शैली माझीच आहे.’’