Wimbledon 2024 Carlos Alcaraz vs Novak Djkovic: कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचा अंतिम फेरीत पराभव करत विम्बल्डन २०२४चे जेतेपद पटकावले आहे. या विजयासह कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले. अल्काराझने अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी करत सरळ सेटमध्ये दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला नमवले.

२१ वर्षीय कार्लोस अल्काराझने पहिला आणि दुसरा सेट ६-२, ६-२ असा जिंकला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये नोवाकने चांगली सुरुवात केली होती. हा सेट ६-६ असा बरोबरीत होता, त्यानंतर टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला. सुरुवातीपासूनच नोव्हाक जोकोविचवर अल्काराझ वरचढ दिसत होता. त्याने या माजी चॅम्पियन खेळाडूला पहिल्या सेटमध्ये टिकून राहण्याची संधी दिली नाही आणि ६-२ च्या फरकाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सारखीच कामगिरी करत अल्काराझने तो सेट ६-२ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकने झुंज दिली आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेण्यात यश मिळविले पण ते पुरेसे नव्हते. ७-६ अशा फरकाने शेवटचा सेट जिंकून अल्काराझने विजेतेपदावर कब्जा केला. २०२३ मध्येही हे दोन्ही टेनिसपटू विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते, जिथे अल्काराझने बाजी मारली होती.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

कार्लोस अल्काराझने रचला इतिहास

२१ वर्षीय अल्काराझने अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम कायम ठेवत आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकले. अल्काराझने २०२२ मध्ये यूएस ओपनच्या रूपाने त्याच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले होते. फ्रेंच ओपन आणि Wimbledon सलग जिंकणारा अल्काराझ आता सहावा खेळाडू ठरला आहे. एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा आणि गवत, माती आणि हार्ड कोर्टवर विजेतेपद पटकावणारा अल्काराझ, वयाची २२ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी दोन विम्बल्डन विजेतेपद पटकावणारा बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा – IND vs ZIM: अभिषेक शर्माचा पदार्पणाच्या मालिकेत अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे २४वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न कार्लोस अल्काराझमुळे अपुरे राहिले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या या महान खेळाडूला २१ वर्षीय तरुणाने जिंकण्याची संधी दिली नाही.